राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती साजरी...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद येथे संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर किशोर जी केला सर आणि मुख्य संयोजिका माननीय डॉक्टर स्वातीताई केला मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.या कार्यक्रमाला केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर जे प्राचार्य विनायक उमाळे, प्राचार्य ईश्वरे सर ,पर्यवेक्षिका व्यवहारे मॅडम,म्हसाळ मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजामाता यांच्या धैर्य ,कर्तुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडविण्यात त्यांच्या भूमिकेवर आधारित सुंदर नाटिका सादर केली. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीवर आधारित प्रेरणादायी गोष्ट सांगण्यात आली व प्रेरणादायी विचार भाषणातून विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वामी विवेकानंद यांचे "उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य करेपर्यंत थांबू नका."हे वचन लक्षात ठेवण्याचे आवाहन केले.तसेच राष्ट्रमाता जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेल्या शिकवणीवर विशेष भर दिला.नर्सरी ते केजी टू च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत येऊन एक ते दोन वाक्यात आपले विचार व्यक्त केले.. तसेच पहिली ते नववीच्या प्रत्येक वर्गात प्रश्नमंजुषा,गीत सादरीकरण अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उज्वला अवचार मॅडम यांनी केले. तर सौ वैष्णवी सातव मॅडम यांनी जिजाऊ वंदना गायली. सौ. दीप्ती यादगिरे मॅडम यांनी राष्ट्रमाता जिजामाता तर सौ. वैशाली केला मॅडम यांनी स्वामी विवेकानंद यांची माहिती सांगितली .तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. प्रीती खडसान मॅडम ,सौ. दिपाली ठाकरे मॅडम ,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
