रब्बी२०२३ पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू...


 
रब्बी२०२३ पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू...

जळगांव जामोद प्रतिनिधी-:- 

सन २०२३ मधील पिक विमा मिळावा यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.२०२३ मधील रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा मक्का गहू व इतर पिकांचा विमा काढला होता. यामध्ये पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांचा पिक विमा मान्य केल्यावरही शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केलेली नाही.संदर्भात जिल्हा कृषि अधीक्षक यांनी निवडणूक झाल्यानंतर पिक विमा शेतकऱ्यांना देण्यात येईल असे लेखी पत्र काढले होते तरीही आजपर्यंत शेतकऱ्यांना रब्बी पीक विमा २०२३ मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी यासाठी सतत पिक विमा कंपनी व कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला मात्र आज तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगांव जामोद येथे शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Previous Post Next Post