येऊलखेड येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन...


 
येऊलखेड येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

शेगाव तालुक्यात असलेल्या येऊलखेड येथील सदन शेतकरी विनायक तुकाराम पुंडकर यांच्या ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम कीर्तनकार असलेले ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक २२ जानेवारी रोजी येऊलखेड येथे आयोजित करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराज यांचा शेगाव तालुक्यामधील येऊलखेड गावात कीर्तनाचा कार्यक्रम व्हावा याकरिता १७ जानेवारी रोजी बैठक संपन्न झाली.यामध्ये सर्वानुमते ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करावा अशी सर्वांनी इच्छा प्रकट केली. येऊलखेड येथील सदन शेतकरी विनायक तुकाराम पुंडकर यांच्या ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ह भ प इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम २२ जानेवारी रोजी येऊलखेड येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे..

Previous Post Next Post