राष्ट्रीय लहूशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष (अनु.जाती) परिमल दादा कांबळे यांचा वर्धा जिल्ह्याचा दौरा...


 
राष्ट्रीय लहूशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष (अनु.जाती) परिमल दादा कांबळे यांचा वर्धा जिल्ह्याचा दौरा....

आर सी २४ न्युज नेटवर्क....

दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय लहूशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परिमलदादा कांबळे यांचा वर्धा जिल्ह्याचा दौरा आयोजित होता.सर्व प्रथम त्यांनी, देवळी गाठत, राष्ट्रीय लहुशक्ती चे देवळी पुलगाव विधानसभा प्रमुख स्व.अशोकराव डोंगरे, यांचे काजलसारा गावातील निवस्थानी भेट दिली, त्यांच्या मातोश्री, अर्धांगिनी, भाऊ, मुलगा सूनबाई, यांचे सांत्वन करित त्यांना धीर दिला, व स्वतः ते त्यांचे दुःखात सहभागी असुन डोंगरे कुटुंबीय सोबत आपण पुढेही सोबत राहणार असून, भविष्यात काही मदत, लागल्यास हक्काने फोन कराल,ही विनंती केली.नंतर देवळी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय गाठत, रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दुर्गाबाई कांबळे अडेगाव यांची पदाधिकारी समवेत रुग्णालयात भेट घेतली, त्यांचे व त्यांचे कुटुंबीय कडून विचारपूस करीत, हल्ल्याची व संबंधित डॉक्टरांकडून उपचाराची माहिती जाणून घेत,योग्य औषधोपचार व उपचार करण्याचे निर्देश दिले. व जिल्हा पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ डोंगरे, यांना वनविभाग मार्फत मिळणारे आर्थिक लाभाबाबत संपूर्ण कार्यवाही बद्दल सूचना केल्या, व त्यांना मदतीचा हात देत, राष्ट्रीय लहुशक्ती वर्धा जिल्हा आपल्या सोबत आहे.काहीही आवशकता भासल्यास हक्काने कळविण्याच्या सूचना केल्या.नंतर त्यांनी देवळी गाठत,देवळी येथील विश्राम भवन येथे, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली. त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या की कामाला लागा, दिवस जवळ आलेले आहे.आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या असून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका जवळ येत आहे.जे कोणी राष्ट्रीय लहुशक्ती चे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकी मध्ये इच्छुक असेल, त्यांनी तयारी ला लागावे, व जिल्हा अध्यक्षांना सूचना देत, सर्कल नुसार इच्छुक पदाधिकाऱ्यांचे नाव नोंद करण्यास सुरुवात करावी, अशा सूचना केल्या, परंतु यातही जे संघटनेतील जबाबदार व ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहे.त्यांना पहिले अग्रक्रमाने प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या.या दौऱ्या दरम्यान परिमल दादा कांबळे, यांचे सोबत त्यांच्या मातोश्री रेखाताई कांबळे, राष्ट्रीय लहुशक्ती महिला प्रदेश उपाध्यक्षा सुमनताई बावणे, वर्धा जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ डोंगरे, जिल्हा सरचिटणीस प्रविनभाऊ डोंगरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सातिशभाऊ गवळी, महिला जिल्हा अध्यक्षा आशाताई वाघमारे, दशरथजी भूजाडे, मनोहरराव डोंगरे, वसंतराव बावणे, जाधव बंधू व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post