कृष्णराव भाऊंनी संपूर्ण परिसर शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध आणि संपन्न केला. - आमदार धीरज लिंगाडे


कृष्णराव भाऊंनी संपूर्ण परिसर शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध आणि संपन्न केला. - आमदार धीरज लिंगाडे.

जळगाव जामोद प्रतिनिधी....

जळगाव व संग्रामपूर परिसर कधीकाळी शैक्षणिक दृष्ट्या फारच मागासलेला होता. आता या परिसरात गावोगात पदवीधर मुले मुली मोठ्या प्रमाणात शिकत आहेत, त्याचे सर्व श्रेय सातपुडा शिक्षण संस्थे चे अध्यक्ष कृष्णरावजी इंगळे यांना जाते. त्यांनी सातपुडा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपला परिसर शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध केला आहे. शिक्षणाची गंगोत्री त्यांनी या परिसरात आणून शैक्षणिक विकास साधला असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य यांनी केले सातपुडा शिक्षण संस्थेच्या उमादेवी सभागृहात मा.आमदार कृष्णरावजी इंगळे वाढदिवसानिमित्त आयोजित संकल्प सोहळ्यात 20 जानेवारी रोजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या सर्व परिसरामध्ये काटकसर करून हा परिसर आपण उभा केलाय. प्रत्येक विद्यार्थ्यां, पालकाचे या संस्थेच्या उत्कर्ष मध्ये योगदान आहे. शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय उद्योजक झाला पाहिजे हे कधीकाळी आपले स्वप्न होते आणि ते आता पूर्णत्वास होण्याचे समाधान आपल्याला आहे. यापुढे सुद्धा कृषीचे उच्च शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमातील सुरू करण्याचा प्रयत्न करू असे, स्वागतास उत्तर देताना व्यक्त केले.यावेळी मतदार संघातील कृष्णरावजी इंगळे यांचे परिसरातील हजारो हितचिंतकांनी उपस्थित राहून त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ.स्वाती संदीप वाकेकर ह्या बोलतांना भावनिक झाल्या होत्या. भाऊंनी या संस्थांना आपलं तिसर अपत्य म्हणून जपल आहे. तसेच पालन पोषण आपल्या मुलासारख केल आहे. जेवढे प्रेम ते आमच्यावर करतात तेवढेच प्रेम या संस्थावर करतात, म्हणूनच आज ही संस्था 34 वर्षे झाली तरी आज वटवृक्षासाठी डोलात उभी आहे व याचा डोलारा हा वाढतच राहील असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण भोपळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप वाकेकर यांनी केले.यावेळी कार्यक्रमासाठी मंचावर परिसरातील सर्व मान्यवर मंडळींचे उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सीईओ नितीन भाऊ सातव तसेच सर्व शाखांचे प्राचार्य प्राध्यापक तथा सातपुडा व महासिद्ध पण परिवाराचे सदस्यांनी मेहनत घेतली..

Previous Post Next Post