राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी बुलढाण्यात गुन्हा दाखल.पोलीस, वन विभाग ॲक्शन मोडवर.उपवनसंरक्षक कार्यालयावर कारवाईसाठी आझाद हिंदने घेतला पुढाकार...


 
राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी बुलढाण्यात गुन्हा दाखल.पोलीस, वन विभाग ॲक्शन मोडवर.उपवनसंरक्षक कार्यालयावर कारवाईसाठी आझाद हिंदने घेतला पुढाकार...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ कलम २ नुसार एफ आय आर क्रमांक ००८३ अन्वे सदर गंभीर गुन्हा प्रथमच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. २१ जानेवारीला आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील काही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी  उपवनसंरक्षक कार्यालयात गेले असता त्यांच्या निदर्शनास सदर गंभीर बाब आली. उपवनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात एका टेबलवर चार राष्ट्रीय ध्वज, तिरंगे कुजलेल्या, फाटलेल्या अवस्थेत बऱ्याच दिवसापासून पडून असल्याचे प्रथम दर्शनी निर्दशनास आले.सदर घटनेचे गांभीर्य पाहता सतीशचंद्र रोठे पाटील यांनी  त्वरित उपवनसंरक्षक कार्यालयातील संबंधितांना कळविले.परंतु त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे  थेट जिल्हा पोलीस अधीक्षक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील,शहर पोलीस स्टेशन ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांना सदर गंभीर घटनेची माहिती दिली. त्यानुसार लगेच अजीर्ण, फाटलेल्या अवस्थेतील चार तिरंगा ध्वज पंचनामा करून  एपीआय बोस यांनी घटनास्थळावरून जप्त केले.काल दुपारी दिलेल्या तक्रारीची दखल घेत आज जिल्हा पोलीस प्रशासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरणी गंभीर गुन्ह्याची नोंद घेतली आहे. तर उपवनसंरक्षक कार्यालयाने सुद्धा त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत सदर प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटनेचे गांभीर्य आणि देशाच्या अस्मितेविषयी सदैव जागरूक असलेली आझाद हिंद शेतकरी संघटना आणि आझाद हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांच्यावर सर्वचस्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post Next Post