शिवसेनेचे भाडेवाढ विरोधात जळगाव जामोद बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन...


 
शिवसेनेचे भाडेवाढ विरोधात जळगाव जामोद बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रस्त्यावर उतरत जळगाव जामोद एस टी स्थानक परिसरात चक्काजाम केला आणि एसटी भाडेवाडीचा तीव्र निषेध केला. एकीकडे लाडक्या बहि‍णींना पंधराशे रुपये द्यायचे अन् दुसरीकडे भाडे वाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावायची,असा हा प्रकार असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव जामोद तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी केली. तसेच यावेळी त्यांनी जळगाव जामोद आगारासह ज्या आगारांमध्ये भंगार बसेस आहेत त्या बदलून त्या ठिकाणी नवीन व चांगल्या बसेस देण्यात याव्यात यासह जळगाव जामोद बस आगाराला पंधरा नवीन बसेसची मागणी सुद्धा गजानन वाघ यांनी केली. तसेच जुन्या भंगार अवस्थेतील बसेस तात्काळ भंगार मध्ये जमा करा जेणेकरून नागरिकांना एसटीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल.यावेळी शिवसैनिकांनी या अन्यायकारक एसटीच्या भाडेवाढी विरोधात निषेधार्थ महायुती सरकार आणि परिवहन मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध केला. यावेळी जळगाव जामोद पोलिसांनी सर्व शिवसैनिकांना स्थानबद्ध करून पोलीस स्टेशनमध्ये आणले होते. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुस्ताक भाईजान, युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम पाटील, विधानसभा संघटक भीमराव पाटील,संग्रामपूर तालुका प्रमुख रवि झोडोकार,शहर प्रमुख रमेश ताडे, संकेत रहाटे, विशाल पाटील, विजय मारोडे, उल्हास माहोदे, गणेश धुर्डे, शांताराम धोटे,विशाल ताकोते,शेख चाँद कुरेशी,अंनिस शेख, फारूख भाई,जाकीर कुरेशी, विजय काळे,सुधीर पारवे,पवन अवचार, माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ मिसाळ,संग्रामपूर उपतालुका प्रमुख विजय मारोडे,युवा सेना विधानसभा संघटक अजय घिवे,युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत इंगळे,निलेश झाडोकार ,राजु पाटिल,राजु पाटिल भारसाकडे, संतोष डब्बे यांच्यासह जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने या चक्काजाम आंदोलनात सहभागी होते.

Previous Post Next Post