सुमीत रामकिसन खंडारे यांची सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कारासाठी निवड...

सुमीत रामकिसन खंडारे यांची सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कारासाठी निवड...

आर सी २४न्युज नेटवर्क....

"मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या प्रेरणेने राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार महासंमेलन2025" यांच्या राज्यस्तरीय पुरस्कार "सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते .यामध्ये नुकतेच पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कार्यकर्ते ,पत्रकार सुमीत रामकिसन खंडारे यांची राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. असे पत्र या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गुणिजन गौरव पुरस्कार मानकरी महामंच यांनी दिले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत,त्यांची निवड राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कारसाठी करण्यात आली आहे. मुंबई येथे होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

Previous Post Next Post