क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मातोश्री नथियाबाई विद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न...


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मातोश्री नथियाबाई विद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे संविधान दिन अमृतमहोत्सव वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले २६ डिसेंबर रोजी वादविवाद स्पर्धा, २७डिसेंबर एक मिनिट भाषण स्पर्धेचे आयोजन केले.२८ डिसेंबर रोजी हस्ताक्षर स्पर्धा,३० डिसेंबर रोजी गीत गायन व ३१ डिसेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. एक जानेवारी रोजी प्रश्नमंजुषा व नववर्षाचे स्वागत तसेच ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वेशभूषा स्पर्धेचे तसेच भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ३जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनी सुनगाव येथील पत्रकार शिवदास सोनोने व अनिल भगत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमांना अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक एस.एस. इंगळे सर उपस्थित होते.मुख्याध्यापक संजय इंगळे व विद्यालयाच्या सर्व शिक्षकांच्या वतीने पत्रकार बंधूंचे शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शाळेतील महिला शिक्षिका घोटेकर मॅडम ,कुमारी राजपूत मॅडम ,उमाळे मॅडम व गवई मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक सोळंके सर ,इंगळे सर, डी के सर ,फोलाने सर,अतुल पाटील सर ,उमेश पाटील सर, शुभम कुलट सर, तेजस बोंबटकार, सुवर्णसिंग राजपूत,रामेश्वर कुनगाडे,विशाल वसूलकर उपस्थित होतेतसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post