दत्ताभाऊ उगले यांचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश...
जळगांव जामोद प्रतिनिधी-
शिवसेना उ. बा. ठा गटाचे दत्ताभाऊ उगले यांनी शिवसेना शिंदे गटात केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते श्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रवेश घेतला.बुलढाणा येथे काल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांचे हस्ते श्री दत्ता उगले मांडवा,श्री अशोक गवळी मा.उपसभापती,श्रीराम झाल्टे,दशरथ पाटील,शिवाजी घुळे पिपळगाव काळे,बाबुराव झाल्टे यांचा शिवसेना,पक्ष प्रवेश केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांचे हस्ते संपन्न झाला.यावेळी जळगांव जामोद बाळू शिमरे तालुका प्र. प्रमुख, उल्हास पाटील किसान सेना तालुका प्रमुख, अमोल दाभाडे युवासेना तालुका प्रमुख उपस्थित होते.
