बी एस पटेल महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनी कर्मचारी व विद्यार्थी यांचा सत्कार...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यांनी आपल्या शुभेच्छा पर संदेशामध्ये विद्यार्थ्याने ध्येय निश्चित करावे, कष्टाने शिक्षण घेऊन पुढे जावे व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे, असे सांगून प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या करिअर कट्टा या स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र मध्ये महाविद्यालयाने जिल्ह्यातून द्वितीय स्थान मिळविले त्याबद्दल प्राचार्य व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. मुंबई येथील जे जे हॉस्पिटल चे माजी उप अधिष्ठाता डॉ सादिक पटेल यांनी शुभेच्छा संदेश पाठविला. त्यांनी बी एस पटेल शैक्षणिक संकुलातील प्रगतीपथावर असलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत महाविद्यालयाला वेगवेगळ्या विषयांमध्ये प्राविण्य मिळविण्याकरीता शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित पळशी वैद्य चे उपसरपंच निलेश भाऊ भोपळे दरबार सिंग जाधव वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शेख फराह, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम बी इंगळे हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित तडवी डे कॉलेजचे प्राचार्य मोहम्मद शोयब कॉन्व्हिटच्या प्राचार्य तृप्ती भोपळे प्रा मुदस्सर अली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ बाबाराव सांगळे व प्रा जितेंद्र कचवे तर आभार प्रदर्शन प्रा प्रदीप गायकवाड यांनी केले.
