जि .प. मराठी उच्च प्राथमिक शाळा वडगाव गड शाळेमध्ये प्रजासत्ताक दीन साजरा...


 
जि .प. मराठी उच्च प्राथमिक शाळा वडगाव गड शाळेमध्ये प्रजासत्ताक दीन साजरा...

ओम उन्हाळे/वडगाव गड....

वडगाव गड येथील जिल्हा परीषद मराठी शाळेमध्ये 26 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वर्ग पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य स्पर्धा, नाटिका या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या प्रजास्त्तक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षक वर्ग आणि विदयार्थी मंडळींनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते यावरशी पहिली पासून ते सातवी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपले नृत्य सादर केले असे चिमुकल्यांचे नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी खूप गर्दी केली होती या सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली उपस्थित शाळेतील विद्यार्थी पालक वर्ग, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग, व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले होते कामे समताच उपस्थित त्यांनी प्रत्येक गाण्याच्या मागे टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांचा उत्साह वाढवण्याकरता अनेक प्रेक्षकांनी बक्षीसही दिली त्याचप्रमाणे गावातील मंडळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरता बक्षीस दिली या कार्यक्रमात जवळपास 17 हजार रुपये बक्षीस आले.हा कार्यक्रम मुख्याध्यापक विजय अवचार, प्रा. दत्तात्रय खेर्डेकर, देविदास खेर्डेकर, किशोर बोदडे, कु गोकुळा खुमकर, अंबिका आढाव, नितीन डकले , प्रसाद गव्हाळ यांच्या उपस्थितीत पार पडला..

Previous Post Next Post