शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगांव जामोद शहर शिवसेनेचे वतीने आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी समस्त शिवसैनिकांचे दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त साहेबांना अभिवादन करण्यात आले.ग्रामीण रुग्णालयात फळे आणि बिस्किटांचे वाटप त्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद व प.स. क्या निवडणुकीसंदर्भात शहरात तसेच ग्रामीण भागात गाव तेथे शिवसेना घर तेथे शिवसैनिक अशाप्रकारे शिवसेना संघटन वाढीच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे,प .स. चे माजी सभापती हरिभाऊ पारस्कर यांचे प्रमुख उस्थितीती मध्ये बैठक पार पडली यावेळीसंजय धुळे,शहर प्रमुख संजय भुजबळ, तालुका प्रसिध्दी प्रमुख बाळू पाटील, माजी नगरसेवक संतोष बोरसे, किसान सेना तालुका प्रमुख गजानन बाप्पू देशमुख,उपशहर प्रमुख एकलव्य पाटील, पंडित माटे, राजेंद्रसिंग परिहार, रामभाऊ पारस्कर,शाखा प्रमुख विलास दातिर, अंबादास धूर्डे,रामदास पाटील, मनीष वाघ, रामदास निमकरडे, विभाग प्रमुख अंबादास चौधरी,नावेद भाऊ,अंकुश वंडाले,गणेश राऊत, श्रीकृष्ण हिस्सल यांचेसह अनेक शिवसैनिकांची यावेळी उपस्थिती होती.
