हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन साजरी..


 
हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन साजरी...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगांव जामोद येथे दिनांक २३/१/२०२५ रोजी जळगांव तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी जळगांव जामोद शहरामध्ये हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्य शहरातील आवजीसिध्द कॉन्व्हेन्ट येथे विदयार्थ्यानां फळ व शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले तसेच नगर परिषद छत्रपती. शिवाजी महाराज शाळा क्र ३ मध्ये गरीब व गरजु विदयार्थ्यांना शालेय साही त्यामध्ये वही पेन तसेच बिस्कीट वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण रूग्णालय जळगांव जामोद येथे सुद्धा गरीब गरजू रूग्णांना फळं, बिस्कीटं वाटप करण्यात आले. तसेच खामगांव येथे उपजिल्हा रूग्णालय यांच्या रक्तपेढीमध्ये गरजु लोकांकरिता जळगांव जामोद तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनीकांनी रक्तदान करून रक्तदान शिबीर पार पाडले.यावेळी शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख मुश्ताक भाईजान, सहसंपर्क प्रमुख दत्ताभाउ पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, तालुकाप्रमुख गजानन वाघ, उपशहर प्रमुख शेख चाँद कुरेशी, माजी उपसभापती विजय काळे, शहरप्रमुख रमेश ताडे,शांताराम धोटे, उल्हास माहोदे, विशाल ताकोते, विशाल पाटील, रमेश हागे, संकेत रहाटे, संतोष डब्बे, फारूक भाई, गणेश धुळे, ईश्वर वाघ, युवराज देशमुख, सुभाष माने,गजानन खुपसे, अरूण सोनोने, शरिफ कुरेशी, शेख अनीस, सुधीर पारवे,इम्रान पठाण व शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत वरील कार्यक्रम संपन्न झाला.

Previous Post Next Post