क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना झोपवले फरशीवर...


 
क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना झोपवले फरशीवर...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी....

तालुका स्तरीय क्रीडास्पर्धा जि.प. हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. यासाठी आलेल्या आदिवासी लहान चिमुकल्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री फरशीवर चटई टाकून त्यावर झोपवण्याचा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यातील शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी आणले ते शिक्षक मस्त आपल्या घरी जाऊन झोपले व चिमुकल्यांना जि.प. हायस्कूलच्या चौकीदाराच्या भरवश्यावर ठेवले. रात्रीला गटशिक्षणाधिकारी यांनी त्या ठिकाणी भेट दिल्यावर हे पितळ उघडे पडले.जि. प. प्राथमिक शालेय क्रीडास्पर्धा तालुका स्तरावर घेण्यात आल्या असताना रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना थांबविण्याबाबत कुठलेही व्यवस्था नव्हती. विद्यार्थ्यांना मुक्कामी बोलावले असल्यास त्यांची व्यवस्था का करण्यात आली नाही. विद्यार्थ्यांकडून घरून ब्लॅकेट बोलावले, हे त्यांनी ओढलेल्या ब्लॅकेटवरून स्पष्ट दिसून आले. जे मुले मुक्कामी होते, त्यांच्या पालकांकडून संमती घेतली होती काय, याबाबात शालेय शिक्षण विभागाचे कुठले पत्र आहे. अशा आशयाचे निवेदन महारष्ट्र जनक्रांती सेनाचे अध्यक्ष मन्ना दारसिंबे यांनी गटविकास अधिकारी धारणी यांना दिले आहे व संबधित जबाबदार अधिकारी व शिक्षकांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Previous Post Next Post