आवजीसिद्ध प्राथमिक शाळेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
सुनगाव येथील श्री आवजिसिद्ध प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम आवजीसिद्ध मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मिसाळ मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य बळिराम धुळे, प्रमोद येउल,विलास मिसाळ यांनी पूजन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी माँसाहेब जिजाऊंची वेशभूषा करून विविध भाषणे, गाणी तसेच पोवाड्यांचे गायन यावेळी विद्यार्थ्यांनी केले. यावेळी विद्यार्थिनींनी सर्वांसमोर लाठीकाठीचा सराव करून दाखविला.. तसेच यावेळी विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सुद्धा केले..आवजीसिध्द व्यायाम शाळेचे अध्यक्ष आनंद आंबेकर, शुभम हागे, प्रथमेश मिसाळ, सचिन लाहुडकार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रेवती मिसाळ, गुंजन हागे, दिया ढगे, अनुष्का पाटिल, तेजू कपले, सृष्टी हागे, अनु कपले, निशा पाटील व इतर सर्व विद्यार्थिनींनी यामध्ये भाग घेतला.. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
