महात्मा फुलेंची मुलींची शाळा ही शैक्षणिक व सामाजिक क्रांती...प्रा. भाऊसाहेब इंगळे..


 
महात्मा फुलेंची मुलींची शाळा ही शैक्षणिक व सामाजिक क्रांती...प्रा. भाऊसाहेब इंगळे..

जळगाव (जामोद)प्रतिनिधी:-

एक जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कार्यकरून मुलींची पहिली शाळा सुरू करून शैक्षणिक व सामाजिक क्रांती केली.त्यांच्या या कार्यामुळेच आज स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत पोहचल्यात व सामाजिक सुधारणा होऊन देश महासत्ता बनू पाहत आहेत असे प्रतिपादन प्रा. भाऊसाहेब इंगळे यांनी केले.स्थानिक एकता नगर मधील राजाभाऊ कोकाटे यांच्या निवासस्थानी फुले दाम्पत्यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेचा १७७ वा वर्धापन दिन दि. १ जानेवारी २०२५ रोजी साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. टी. वाकेकर, प्रमुख मान्यवर डॉ. एस. एन. भोपळे, डॉ. संदीप वाकेकर, डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर, व वत्सला भारस्कर, हुसैन डायमंड, रुख्मिणी तायडे, सुमन शेगोकार आदिंनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमांचे पुष्प, दिप, व धूपाने पुजन करून पुष्पमाला अर्पण केल्यात. या प्रसंगीच डॉ. स्वातीताई वाकेकर, डॉ. एस. एन भोपळे आदि मान्यवरांनी विचार व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक सौ. उज्वाला कोकाटे, यांनी केले तर आभार संतोष तायडे यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिला चराटे, मिनल तायडे, विनीत कोकाटे, नितीन तायडे, रेखा तायडे, हिरकणी बडगे, कोमल बडगे आदींनी परिश्रम घेतलेत व भोजनदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

Previous Post Next Post