शिंदी बु. येथील घटना..अवैध व्यवसायाची माहिती दिली म्हणून सनी भीमसागर याची हत्या...


 
शिंदी बु. येथील घटना..अवैध व्यवसायाची माहिती दिली म्हणून सनी भीमसागर याची हत्या...

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिंदी बु. येथे ३१ डिसेंबरच्या रात्री ९ वा. सुमारास सनी दशरथ भीमसागर (२३) या युवकावर गावातीलच शेजारी राहणाऱ्या अभिजीत बबन मात्रे याच्या सह चौघांनी तलवारीने हल्ला करत हत्या केल्याची घटना घडली.शिंदी बु. येथील शाळेच्या प्रवेश द्वारा समोर अवैध दारु व गुटखा विक्री होत असल्याची तक्रार शाळेच्या शिक्षकांसह पालकांनी पथ्रोट पोलीसांना केली होती. या तक्रारीत सनीचा सहभाग होता या संशयावरुन अभीजीत मात्रे याने धारदार तलवारी ने छातीवर वार केला. यावेळी शेख शफिक शेख रफिक सौदागर, शेख आतीक शे. रफिक सौदागर, शुभम उर्फ मुन्नालाल धुर्वे, शंकर मुन्नालाल धुर्वे यांनी मिळून त्याच्यावर वार करत व त्याला ओढत नेत लाताभुक्क्यांनी मारत शिवीगाळ करत त्याची हत्या केली. यावेळी सनीचे वडिल दशरथ भय्यालाल भीमसागर यांना पोटाचा आजार असल्याने त्याला वाचवायला जाऊ शकले नाही. आरडाओरड होताच मृतकाची आईने धाव घेताच हल्लेखोर पळून गेले. यावेळी तत्काळ मृतकाचा छोटाभावाने सनीला उपचारा पथ्रोट येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात त्याला मृत घोषित केले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार अभिजीत मात्रे याने तलवारीने सनीला भोसकून जिवानो ठार मारण्या मागील कारण म्हणजे की माझ्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने त्याची हत्त्या करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १८९ (२) १९१ (२), १९१ (३),११०,१०३ (१), ३५२, ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला असुन पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

पोलिसांचे अवैध व्यवसायीकांना अभय...

पथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात वाढलेले अवैध धंदे कायदा व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार ठरत आहे. पथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीतील शिंदी बु येथील डॉ. डब्ल्यु के. एम. इंग्लिश स्कुल शाळेच्या प्रवेश द्वारावर अवैध दारु व गुटखा विक्रीसह बेकायदेशीर कामे एका झोपडीत रात्र दिवस सुरु असल्याने येथील विद्यार्थी, पालक व महिला वर्ग त्रस्त झाले होते या बाबत शाळेचे पालक व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला व पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. तरी कुठलीच कारवाई झाली नाही पथ्रोट पोलिस स्टेशनला ११ डिसेंबर रोजी अवैध धंदे सुरु असल्या ची माहिती दिली असुन सुध्दा कुठलीच कारवाई केली नाही. हे अवैध धंदे करणाऱ्या आरोपींना पोलिसात तक्रार दिल्याचे चिडून सनीची हत्या केली आहे. पोलिस प्रशासनाने तक्रारीची का दाखल घेतली नाही असा प्रश्न या घटनेवरुन उपस्थित केल्या जात आहे. अवैध धंदे करणाऱ्यांना बिट जमादार व पोलिस अधिकाऱ्यांचे अभय होते का? असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहे. पोलिसांनी वेळेतच कारवाई केली असती तर ही हत्या झाली नसती.

Previous Post Next Post