खामगाव विधानसभा मतदारसंघातिल न्यायालयीन कामकाजासाठी पर्यायी जागेच्या संदर्भात बैठक संपन्न...नामदार आकाश फुंडकर यांनी बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना कडक निर्देश...


 
खामगाव विधानसभा मतदारसंघातिल न्यायालयीन कामकाजासाठी पर्यायी जागेच्या संदर्भात बैठक संपन्न...नामदार आकाश फुंडकर यांनी बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना कडक निर्देश...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी – 

खामगाव विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन न्यायालयीन इमारत बांधकामासंबंधी महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीचा प्रमुख उद्देश न्यायालयीन कामकाजासाठी लागणारी पर्यायी जागा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करणे व नियोजनबद्ध पद्धतीने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करणे हा होता.मागील काळात खामगाव विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात मोठी न्यायालयीन इमारत उभारण्यासाठी 88 कोटी 94 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा व नियोजित वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी ही बैठक बोलावण्यात आली. मतदारसंघातील नागरिकांनी तिसऱ्यांदा निवडून दिलेल्या माननीय आकाश फुंडकर यांनी हा विषय आपल्या प्राधान्यक्रमात ठेवून त्वरित पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.बैठकीमध्ये खामगाव मतदारसंघातील हा प्रकल्प त्वरित सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. नामदार आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व संबंधित प्रशासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नवीन न्यायालयीन इमारत उभारणीपूर्वी, न्यायालयीन कामकाजासाठी पर्यायी जागेची तत्काळ व्यवस्था करणे हा प्रमुख मुद्दा होता. पर्यायी जागा शोधण्याबाबत कोणकोणत्या शक्यता तपासाव्यात, त्या जागेची प्रशासकीय कार्यवाही कशी करावी, यावर संयुक्त चर्चा झाली.नामदार आकाश फुंडकर यांनी बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना कडक निर्देश देत सांगितले की, या प्रकल्पात कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही.  न्यायालयीन इमारतीचे काम वेळेत पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे कुठल्याही विभागाने कागदपत्रांची पूर्तता, तांत्रिक कार्यवाही किंवा प्रशासकीय मंजुरी यांमध्ये विलंब टाळावा.या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी शेलार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी (SDO) डॉ. पुरी, नगरपरिषद मुख्याधिकारी शेळके, गटविकास अधिकारी राजपूत, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) खरात, गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती) गायकवाड, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) एकनाथ तळेले, उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) काळे, नायब तहसीलदार कुमारी भाजीभाकरे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post