अकोट येथे ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ संपन्न...


 
अकोट येथे ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ संपन्न...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

अकोट येथील स्थानिक विश्रामगृह येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ निमित्ताने प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला रविंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२-०१-२०२५ मोटार वाहन निरीक्षक अनिरुद्ध देवधर यांच्या अध्यक्षतेखाली व ( मो वा नी ) दत्तात्रय धनवाडे व( सहाय्यक मो वा नी ) महाले सर( सहाय्यक मो वा नी )चैत्राली इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शेकडो विद्यार्थ्यां सोबत पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण लोडम यांनी केले या मध्ये अकोट येथील सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व प्रशिक्षक पण उपस्थित होते.श्रीगजानन मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सचिन गावत्रे ,गजानन मोटार ड्रायव्हिंग स्कूल हिवरखेडचे संचालक प्रशांत ढोकने,अकोट मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक खालिद अहमद,गुडलक मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अनिस भाई,एम एस मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मक्सूद शाह व इतर सहकारी रूपेश मणियार,दिलीप सेदानी,गोपाल नवले,सैय्यद करामत अली मीरसाहेब,संतोष बोम्बटकार या सर्वाचा सहभाग राहला.व कार्यक्रम सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभागा तर्फे सर्वांना रोड सेफ्टी संदर्भात तयार केलेली पुस्तक वाटप करण्यात आला.यावेळी दैनिक देशोंनतीचे राहुल कुलट,सैय्यद अहमद,पत्रकार अभिषेक पाठक,पत्रकार देवानंद खिरकर यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post