नेताजी जयंती पराक्रम दिवसानिमित्त.मोफत आरो प्लांटचे लोकार्पण.आझाद हिंद च्या प्रयत्नांना यश..


नेताजी जयंती पराक्रम दिवसानिमित्त.मोफत आरो प्लांटचे लोकार्पण.आझाद हिंद च्या प्रयत्नांना यश...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिवस आणि बाळासाहेब ठाकरे जयंतीचे अचैत्य साधत पर्यटक व नागरिकांसाठी फिल्टर निशुल्क पाणी मिळावे देण्याचा उदांत भावनेतून दैनंदिन  एक हजार लिटर पाणी वाटप होईल इतका भव्य आरो प्लांट राणी बागेत सुरू करण्यात आला.राणी बागेत दैनंदिन येणाऱ्या लहान बालकांना, पर्यटक, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. परिसरात जवळपास हॉटेल, कॅन्टीन, घर काहीच नसल्यामुळे पर्यटक, नागरिक आणि लहान मुलांना पाण्याविना कासावीस होण्याची वेळ येत असे. सदर घटनेचे गांभीर्य आझाद हिंद संघटनेच्या निदर्शनास आले त्यामुळे आझाद हिंद च्या वतीने सदर मागणी संबंधित उपवनसंरक्षक प्रशासनाकडे मागील बऱ्याच दिवसापासून प्रामुख्याने लावून धरली होती. सदर मागणीचे महत्त्व आणि नेताजी जयंती पराक्रम दिवसाचे अचैत्य साधत ॲड.सतीशचंद्र  रोठे पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून चार लक्ष किमतीच्या आरो प्लांट निशुल्क जनसेवेत लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरएफओ अभिजीत ठाकरे, रवींद्र गवळी, अमोल चव्हाण, संदीप मडावी, सुरेखाताई निकाळजे,प्रमिलाबाई सुशीर,सिंधुताई अहेर,पंचफुलाबाई गवई,आशाताई गायकवाड, निर्मलाताई रोठे, संजय एंडोले, गुणवंत पाटील, गजानन झांबरे यासह देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post Next Post