सावित्रीमाई मुळेच महिलांना सन्मानाचे स्थान मिळाले. सुरेखा निकाळजे, सावित्रीमाईंच्या जयंतीनिमित्त चर्चासत्राचे आयोजन.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
चूल आणि मूल बाजूला सारून महिलांना शिक्षणाची द्वारे उघडून देणाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुलेंच्या त्याग आणि समर्पणामुळेच महिलांना सन्मानाचे स्थान मिळाले. असे मत रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे यांनी व्यक्त केले.रमाई ब्रिगेड,किसान ब्रिगेड,मातृतिर्थ रणरागिनी संघटना, आझाद हिंद महिला संघटना, झाशी राणी ब्रिगेड, आझाद हिंद संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीमाईंच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाईंची महिला क्रांती या विषयावर दोन सत्रात चर्चा सत्राचे आयोजन 3 जानेवारीला सायंकाळी बुलढाणा करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.चर्चासत्रामध्ये पंचफुलाबाई गवई, यशोदाबाई खंडारे ,अन्नपूर्णाबाई जिने, अँड सतीशचंद्र रोठे, दौलत चव्हाण, भागवत काळदाते, राहुल जागीड, कैलास पाटील, राजू कावडे, सुभाष भागीले, सतीश हिवरकर, सविता इंगळे आशाताई गायकवाड, सिंधुबाई आहेर, पुनम गायकवाड,जयश्री गायकवाड, संजय येंडोले, आदींनी सहभाग घेत चर्चासत्रात अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.सर्वप्रथम सावित्रीबाईंच्या प्रतिमेला सामूहिक मल्यार्पण आणि अभिवादन करून चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली.सावित्रीबाईंच्या समर्पणातून महिलांची पहिली शाळा सुरू झाली. ज्यावेळी महिलांना घराबाहेर निघणे चालणे बोलणे दुरापास्त होते. अशा परिस्थितीत मुलींच्या शिक्षणाची क्रांती घडविणाऱ्या सावित्रीबाई देशातील प्रथम आद्य शिक्षिका आहे. त्यांच्यामुळेच आज महिला पंतप्रधान राष्ट्रपती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहे. हा सन्मान सावित्रीबाईंचा आहे. असा एकंदरीत सूर चर्चासत्रातून समोर आला. यशस्वीतेसाठी आयोजक सर्व संघटनाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. चर्चासत्राला बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील साहित्यिक, कलावंत, वारकरी, व्यवसायिक, महिला संघटनांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने चर्चासत्राची सांगता करण्यात आली.
