केनव्दारे अवैधरित्या रेतीचा साठा व विक्री बंद करा अन्यथा आंदोलन शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांचा निवेदनाद्वारे ईशारा...


 
केनव्दारे अवैधरित्या रेतीचा साठा व विक्री बंद करा अन्यथा आंदोलन शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांचा निवेदनाद्वारे ईशारा...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असून दिवसाढवळ्या केन मशीनव्दारे भेंडवड बुद्रुक व खुर्द, माहुली, गोळेगाव पांडे जुने, गोळेगाव हुरसाळ,दादुलगाव या गावांमध्ये पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन केल्या जात आहे. तसेच रेतीचे साठे जमा केले आहेत. यापूर्वी देखील मंडळाधिकारी यांनी काही गावांमध्ये रेतीचे साठे जप्त केले होते परंतु त्याचा लिलावला झाल्यामुळे तरी ती माती आता येथे तस्करांकडून जप्त केलेला साठा चोरी करण्यात आला. जप्त केलेला रेती साठा शासकीय ठेकेदार व शासकीय कामावर लिलाव करून देण्यात यावा. तसेच जळगाव जामोद तालुक्यामध्ये दररोज अंदाजे १० टिप्पर व ५० रेती ट्रॅक्टर द्वारे जळगाव जामोद परिसरामध्ये रात्री वेळेस मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू असते. तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांनी वाहन पकडले असता अधिकाऱ्यास शिवीगाळ, लोटपाट, व जे मारण्याच्या धमक्या देऊन वाहने पळवून नेतात असाच प्रकार आपल्या जळगाव जामोद मध्ये रेती माफीयांविरूध्द मोक्का कायदयाअंतर्गत कार्यवाही करावी असे आदेश काढले आहेत. परंतू महसूल विभागाकडून अदयापही कोणत्याही रेती माफीयांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात आलेली नाही. तत्कालीन तहसिलदार व मंडळ अधिकारी तथा तलाठी यांनी मागील वर्षी २०२४ मध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये मोठया प्रमाणात रेतीसाठे जप्त केले होते व त्याचा लिलाव सूध्दा करण्यात आला होता परंतू रेती माफीयांनी ते सर्व अवैधरित्या साठवलेले रेतीचे साठे चोरून नेवून विक्री केली आहे त्यासंदर्भात रेती माफीयाविरूध्द जळगांव जामोद पोस्टे अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.रात्रंदिवस रेतीमाफीया व अवैध गौणखनिज वाहतुक करणारे वाहनांविरूध्द कार्यवाही करण्याकरिता कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचा-यांचे पथक तयार करून कडक कार्यवाही करावी अशी मागणी दिनांक ३ जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.तसेच तहसीलदार पवन पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यामुळे निश्चीतच ते वरील रेतीमाफीया व गौणखनिज माफीयांविरूध्द कार्यवाही करतील अशी अपेक्षा शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांना आहे यावेळी निवेदन देताना सुनगाव शिवसेना शाखाप्रमुख सुनील गवई व इतर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post