कु.प्रतिक्षा भिमानंद तायडे हिची आँक्सफर्ड लंडन येथे msc डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमासाठी निवड...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद येथील वास्तव्यास असलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कवी,गायक भीमानंद तायडे यांची मुलगी कु.प्रतिक्षा तायडे हिची ऑक्सफर्ड लंडन येथे msc डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे .कुमारी प्रतीक्षा तायडे हिचे जन्मगाव झाडेगाव असुन तिने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा झाडेगाव येथुन घेतले व नंतर माध्यमिक शिक्षणाकरिता डॉक्टर आंबेडकर विद्यालय जळगाव जामोद येथे १० पर्यंतचे शिक्षण घेऊन नंतर महाविद्यालयीन ११,१२ वी शिक्षण जळगाव शहरातीलच दि.न्युईरा कॉलेज येथून घेतले. नंतर तिने पदवी पर्यंतचे शिक्षण कला शाखेतुन आबासाहेब करणारे महाविद्यालय पुणे येथून घेतले व नंतर इंटरशिप प्रबुद्ध इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फलटण जिल्हा सातारा येथून घेतले आहे.व आता तिची निवड ऑक्सफर्ड लंडन येथे msc डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमासाठी झाली आहे.तिचे प्रेरणास्थान महात्मा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुष असुन तिचे मार्गदर्शक शिक्षक,आई-वडील व सर्व हितचिंतक.कु.प्रतिक्षा तायडे हिच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे...
