अकोट शहरातून हेल्मेट जनजागृतीसाठी पोलिसांची हेल्मेट रॅली...


 
अकोट शहरातून हेल्मेट जनजागृतीसाठी पोलिसांची हेल्मेट रॅली...

सैय्यद शकिल/अकोट...

सार्वजनिक सुरक्षितता व प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उ‌द्देशाने अकोट उपविभाग, अकोट पोलीस विभागाचे वतीने अकोट शहरामध्ये हेल्मेट ननजागृती रॅली काढण्यात आली"सार्वजनिक सुरक्षितता व प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उ‌द्देशाने बच्चनसिंह, पोलीस अधीक्षक अकोला यांचे मार्गदर्शनाखाली आज दि.०१.०२.२०२५ रोजी स्थानिक अकोट शहरामध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली.सदर रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांनी हेल्मेट घाला, सुरक्षित प्रवास करा आणि आपल्या स्वतःच्या कुटूंबासाठी हेल्मेटचा वापर करा असे नागरिकांना आवाहन करून जनजागृती करण्यात आली. रॅली दरम्यान मोटार सायकलस्वार व नागरिकांना हेल्मेटचे महत्व पटवुन सांगण्यात आले.सदर रॅलीचे नेतृत्व अनमोल मित्तल, सहायक पोलीस अधीक्षक, अकोट उपविभाग, अकोट यांनी केले. रॅलीमध्ये पोलीस निरीक्षक अमोल माळवे, पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे तसेच स्थानिक पोलीस स्टेशन अकोट शहर / अकोट ग्रामीण येथील वाहतुकीचे काम पाहणारे वाहतुक अंमलदार वैयक्तिक वाहनासह वाहतुक गणवेष परिधान करुन ०२ मोटार सायकलसह ०२ वाहतुक अंमलदार, बीट पेट्रोलींग ४ मोटारसायकलसह ०८ अंमलदार, दामिनी ०२ मोटार सायकलसह महिला पोलीस अंमलदार ०४, पोलीस स्टेशन अकोट शहर येथील ४८ मोटार सायकलसह ५२ अंमलदार, आर.सी.पी.१० मोटार सायकलसह २० अंमलदार, एसडीपीओ कार्यालय अकोट येथील ४ अंमलदार ०२ मोटार सायकलसह सहभागी झाले होते. सदर रॅली पोलीस स्टेशन अकोट शहर येथून निघून प्रथम अकोला नाका, त्यानंतर शिवाजी चौक, मच्छी मार्केट, अंजनगाव रोड, धारोळीवेस चौक, आंबोडी वेस, रामटेकपुरा, शौकतअली चौक, मोठे बारगण चौक, बळीराम चौक, सोमवार वेस, यात्रा चौक, नरसिंग रोड, सोनु चौक, शिवाजी चौक यामार्गाने फिरून परत पोलीस स्टेशन अकोट शहर येथे पोहोचून संपन्न झाली.अकोट पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जर कोणतेही पोलीस अंमलदार बाईकने विना हेल्मेट प्रवास करतांना दिसून आल्यास त्याबाबतची माहीती अनमोल मित्तल, सहायक पोलीस अधीक्षक, अकोट उपविभाग, अकोट यांना दयावी. संबंधित पोलीस अंमलदार यांचेवर कारवाई करण्यात येईल.मागील पाच वर्षामध्ये वाहन चालवितांना हेल्मेट न घातल्यामुळे अकोला जिल्हयामध्ये २२३ मोटार सायकलस्वारांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे आणि १४० मोटार सायकलस्वार जखमी झाले होते. मागील वर्षामध्ये जेवढे नागरिक मर्डरमध्ये मृत्यू पावले नसतील त्यापेक्षा अधिक नागरिकांनी हेल्मेट न वापरल्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. नागरिकांनी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास त्यांना ८० टक्के जीवदान मिळु शकते. त्यामुळे वाहन चालवितांना नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले.प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटूंबाची सुरक्षितता लक्षात घेवून हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. अपघातांमध्ये होणा-या गंभीर स्वरुपाच्या जखमा आणि जिवीतहानी टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन हेल्मेट हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. जनतेने जागरुक नागरिक या नात्याने वाहतुक नियमांचे पालन करावे, असे बच्चनसिंह, पोलीस अधीक्षक अकोला यांचेकडुन नागरिकांना आवाहन केले आहे.

Previous Post Next Post