मध्य प्रदेशातून एका चोरट्यासह मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन खामगाव ची संयुक्त कारवाई...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
जिल्ह्यातील घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करुन, अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपीचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्था.गु.शा. बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोनि. अशोक लांडे यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करणे, गुन्ह्याची उकल व आरोपींचा शोध तसेच गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या. सदर अनुषंगाने, खामगांव येथे अप.क्र ४४/२०२५ कलम ३३१(४), ३०५ (अ) भा.न्या.सं. प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी पवण बाळकृष्ण अहीर रा. सावजी ले आऊट खामगांव बाहेरगावी गेले असतांना, अज्ञात आरोपींनी त्यांचे घराच्या दरवाजाचा कळीकोंडा तोडून, घरातून नगदी १,७०,०००/-रु.सह सोन्या-चांदीचे दागीने असा एकूण ४,१४,०००/-रु.चा मुद्देमाल चोरुन नेला होता.दि १७/२/२०२५ रोजी आरोपी तेजपालसिंग निहालसिंग भाटिया वय ३३ वर्षे रा. उधना यास उधना-सुरत, राज्य-गुजरात येथून स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपासामध्ये अटक करण्यात येऊन, त्याचे कडून ०१ मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी कडून पो.स्टे. खामगांव शहर-०२ पो.स्टे. शेगांव शहर-०१ अशा ०३ गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पुढे सुरु आहे.आरोपी तेजपालसिंग निहालसिंग भाटिया वय ३३ वर्षे रा. उधना ता.जि. सुरत राज्य-गुजरात याचा खामगांव न्यायालय यांचे कडून पोलीस कस्टडी रिमांड घेवून, पो.स्टे. खामगांव शहर येथील-०२व शेगांव शहर-०१ गुन्ह्याचे तपास करण्यात येत आहेत. आरोपी रोपी याने गुन्ह्यातील मुद्देमालाची विल्हेवाट लावली होती, त्याचा तपास करुन मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. PCR मधील आरोपी तेजपालसिंग भाटीया रा. उधना याने गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल मध्यप्रदेश राज्यातील ग्राम बलवानी, पो.स्टे. वरला जि. बडवानी येथून हस्तगत करण्यात आला.
हस्तगत मुद्देमाल विवरण:-
(१) सोने-६०ग्रॅम किं. ४,५०,०००/-रुपये, (2) चांदी-१०० ग्रॅम किं. ८०००/-रुपये, असा एकूण-४,५८,०००,/-रु.चा मुद्देमाल.
फरार आरोपी व ईतर मुद्देमाल शोध:-
गुन्ह्यामध्ये ईतर आरोपी निष्पन्न करण्यात येत असून, फरारी आरोपींचा व ईतर मुद्देमालाचा संयुक्त पथकांकडून शोध सुरु आहे. पुढील तपास पो.स्टे. खामगांव शहर करीत असून, गुन्ह्यामध्ये स्था.गु.शा. बुलढाणा समांतर तपास करीत आहे.
गुन्हे करण्याची पध्दती :-
सदर आरोपी हे त्यांचे साथीदारांसह उच्चभ्रु वसाहतीतील बंद असलेल्या घरांची रेकी करुन, सदर घरांमध्ये कोणी राहत नसल्याची खात्री करुन, रात्रीच्या दरम्यान घराचे कळीकोंडा तोडून, घरातून किंमती व मौल्यवान वस्तू चोरुन नेत होते.
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व कार्यवाहीसाठी चे पथक...
ही कामगिरी विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा,अशोक थोरात अपोअ. खामगांव, बी.बी महामुनी- अ.पो.अ.- बुलढाणा यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली, पोनि. अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा, पोनि.रामकृष्ण पवार पो.स्टे. खामगांव शहर यांचे नेतृत्वात यशोदा कणसे, पोहेकॉ. एजाज खान, दिगंबर कपाटे, पोकॉ. अजीज परसुवाले चा. पोकॉ. शिवानंद हेलगे नेमणूक स्थागुशा. बुलढाणा, पोउपनि. राजेश गोमासे, पोना. सागर भगत, पोकॉ. निशांतकुमार कळसकर- पो.स्टे. खामगांव शहर, पोकॉ. कैलास ठोंबरे, ऋषीकेश खंडेराव-तांत्रिक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांनी केली ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली...
