महाआवास अभियानांतर्गत घरकुल योजनेचे जळगाव जामोद मतदारसंघात ५००० लाभार्थ्यांना निधीचे वितरण..९५०० लाभार्थ्यांची घरे मंजूर..


 
महाआवास अभियानांतर्गत घरकुल योजनेचे जळगाव जामोद मतदारसंघात ५००० लाभार्थ्यांना निधीचे वितरण..९५०० लाभार्थ्यांची घरे मंजूर..

जळगाव जामोद प्रतिनिधी...

ग्रामविकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण अंतर्गत महा आवास अभियान २०२४/२०२५ अंतगत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत राज्यात एकाच दिवशी घरकुल मंजुरी प्रमाणपत्र व प्रथम हपता वितरण कार्यक्रम चे आयोजन दिनाक २२ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती जळगाव जामोद येथे आयोजित करण्यात आला होता.तालुका स्तर व ग्रामपंचायत स्तरावर हा महाउत्सव साजरा करण्यात येत असून मतदार संघात ९६०० घरे मंजुरी व ५००० लाभार्थी याना एकाच दिवशी प्रथम हपता आमदार डॉ संजय कुटे यांच्या सुविध्य पत्नी अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला तसेच बालेवाडी पुणे येथे गृहमंत्री भारत सरकार अमितभाई शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते २० लाख लोकांना मंजुरी देण्यात आली सम्पूर्ण राज्यात हा आवास महोत्सव साजरा होत आहे व यासाठी पंचायत समिती स्तरावर सुद्धा प्राथमिक स्वरूपात लाभार्थी यानचा सन्मान आयोजित करण्यात आला आहे,या महोत्सवा सोबतच सातपुडा पर्वताच्या रांगेत अतिक्रमण करून राहत असलेल्या चाळीस टापरी व गोमाल १ व गोमाल २ येथील अतिक्रमण धारकांना सुद्धा त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गट विकास अधिकारी यांनी प्रास्ताविक केले ग्रामपंचायत चे सर्व सरपंच व ग्राप अधिकारी यांचे स्वाक्षरीने मंजुरी पत्र देत सर्व पक्षीय पदाधिकारी, पत्रकार बंधू यांची कार्यक्रमातउपस्थिती होती.संदीप कुमार मोरे गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांचे सह सर्व कर्मचारी वृंद व तालुक्यातील महिला भगिनी पुरुष यांची उपस्थिती होती,

Previous Post Next Post