बी एस पटेल महाविद्यालयामध्ये संविधान गौरव महोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रम...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
पिंपळगाव काळे येथील बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयामध्ये २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम सादर करण्यात आला.महाराष्ट्र शासनाने भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे संविधान गौरव महोत्सव विविध कार्यक्रम घेऊन महाविद्यालयामध्ये साजरा करावा असे पत्राद्वारे सूचित केले होते.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शेख फराह यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे उद्घाटन केले.विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा डॉ बाबाराव सांगळे यांनी भारतीय संविधानावरती विविध प्रश्न तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारले व विद्यार्थ्यांनी उत्साहाने उत्तरे दिली. बरोबर उत्तरे देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक पेन बक्षीस देण्यात आला. उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन बक्षीस असल्यामुळे महाविद्यालयातील पुष्कळ विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. साक्षी सातव व गायत्री ढगे या विद्यार्थिनींनी सर्वात जास्त प्रश्नांची उत्तरे दिली.अशाप्रकारे संविधानाचे जनजागृती व गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ नूर मोहम्मद डॉ अझरुद्दीन काझी प्रा महेश नेतनास्कार डॉ चेतन पलन डॉ निखिल अग्रवाल डॉ आनंद जाधव प्रा प्राजक्ता बाठे डॉ दिपाली सिरसाट प्रा रुपाली आंबेकर प्रा सय्यद जोया प्रा विकास ईसोकार प्रा अमोल वानखेडे प्रा रिजवान गजानन इंगळे गजानन भोपळे विशाल दाणे अमोल देवकर जुबेर खान व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ बाबाराव सांगळे व आभार प्रदर्शन सरिता इंगळे यांनी केले
