२८ फेब्रुवारीला होणार जळगाव जामोद पंचायत समितीची आमसभा-गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे..


 
२८ फेब्रुवारीला होणार जळगाव जामोद पंचायत समितीची आमसभा-गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे..

जळगाव जामोद प्रतिनिधी...

सन २०२४-२०२५ या वर्षातील आढावा व आगामी सन २०२५/२०२६ मधील नियोजनासाठी वार्षिक आमसभा तसेच सरपंच मेळाव्याचे आयोजन दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या प्रांगणात जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये वार्षिक आमसभा तसेच सरपंच मेळाव्यामध्ये ग्रामीण भागातील विविध विषयांचा व समस्यांचा आमदार डॉक्टर संजय कुटे आढावा घेणार असून सोबतच सरपंच मेळाव्यामध्ये प्रशासकीय बाबीचे नियोजन करण्यात येणार आहे. या होणाऱ्या आमसभेसाठी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना आमंत्रित करण्यात आले असून या आमसभेला महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जीवन प्राधिकरण, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिगाव प्रकल्प अधिकारी, महावितरण, एस टी महामंडळ यांना सुद्धा या आम सभेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मधल्या चार ते पाच वर्षाच्या काळातमध्ये विविध अडचणीमुळे आमसभा तसेच सरपंच मेळावा होऊ शकला नाही त्यामुळे या आमसभेमध्ये विविध विषयावर चर्चा होणार आहे. तसेच होऊ घातलेल्या दिनांक २८ फेब्रुवारी रोजीच्या आम सभेमध्ये नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्यांनी दिनांक २७ फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत लेखी स्वरूपात पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावेत असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी केले आहे.

Previous Post Next Post