अंढेरा शिवारात अवैध व विनापरवाना अफूची लागवड करणाऱ्या एकास पकडले.स्था.गु.शा. कारवाई.. १२,६०,२८,०००/-रु.चा मुद्देमाल जप्त..


 
अंढेरा शिवारात अवैध व विनापरवाना अफूची लागवड करणाऱ्या एकास पकडले.स्था.गु.शा. कारवाई..  १२,६०,२८,०००/-रु.चा मुद्देमाल जप्त...

बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...

जिल्ह्यातील युवकांमध्ये वाढत असलेली व्यवनाधिनता कमी होऊन, युवापिढी अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडावी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाटी गांजा व ईतर तत्सम अंमली पदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून, त्यांचेवर "अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम (N.D.P.S.)" कायद्याखाली धडक कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपोअ. अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोनि.अशोक लांडे स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन, त्यांना अफू, गांजा व इतर तत्सम अंमली पदार्थ बाळगणाऱ्या, उत्पादन घेणाऱ्या इसमांचा शोध घेवून, त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.सदर अनुशंगाने, दि.२२/०२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. अंढेरा हद्दीत संतोष मधूकर सानप रा. अंढेरा हा त्याचे मालकीच्या शेतामध्ये विनापरवाना व अवैर्धारत्या अफू या अंमली पदार्थाची लागवड व त्याचे संवर्धन करुन, सदर अफू बाळगून आहे. त्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंढेरा शिवारातील संतोष सानप याचे मालकीच्या शेतामध्ये सापळा रचून अफू संबंधाने कार्यवाही केली. सदर कारवाईमध्ये खालील प्रमाणे शेतात लागवड केलेली अफू अंमली पदार्थ मिळून आला.

आरोपीचे नांव :-

१) संतोष मधूकर सानप वय ४९ वर्षे, रा. अंढेरा ता. देऊळगांव राजा जि. बुलढाणा यास ताब्यात घेतले...

आरोपीचे ताब्यातून हस्तगत मुद्देमाल :-

१) अफू अंमली पदार्थ वजन १५७२ किलो १०० ग्रॅम किं. १२,६०,२८,०००/-रुपये,

गुन्ह्याचे घटनास्थळाचो आरोपीने केलेली सुरक्षा :-

गुन्ह्यामध्ये आरोपी याने त्याचे शेताचे मधोमध १६ गुंठे जागेमध्ये अफूची लागवड करुन संवर्धन केले. लागवड केलेल्या अफूची लोकांना जाणीव होऊ नये, म्हणून चारीबाजूंनी मका पिकाची लागवड केली. तसेच अफूची जागा कोणलाही दिसू नये म्हणून त्यावर ग्रीन नेटने आच्छादन केलेले होते.

गुन्ह्याचा तपास व इतर आरोपी शोध :..

सदर गुन्ह्यामध्ये वरील प्रमाणे कार्यवाही करुन, एका आरोपीस ताव्यात घेण्यात आले असून, आरोपी विरुध्द पो.स्टे. अंढेरा येथे NDPS अॅक्टचे कलम ८ (क), १८(क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्यात इंतर आरोपी निष्पन्न करुन त्यांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती मनिषा कदम उपविगोअ. देऊळगांव राजा करीत आहेत.पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपोअ अशोक थोरात, बी. बी. महागुनी यांनी अफू, गांजा व ईतर अंमली पदार्थ संबंधाने कार्यवाही करणेबाबत आदेश दिले होते. सदर अनुशंगाने, पोनि. अशोक एन. लांडे, स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांनी स्था.गु.शा.ची पथके करुन, अंमली पदाथ संबंधाने गोपनीय माहिती काढून कार्यवाही करणेबाबत मार्गदर्शनात्मक सुचना दिल्या होत्या. सदर प्रकरणी, दि.२२/०२/२०२५ रोजी पो.स्टे. अंढेरा हद्दीत ०१ आरोपी पकडून त्यांचे शेतात लागवड करुन, संवर्धन केलेला अफू अंमली मुद्देमाल वजन १५७२ किलो १०० ग्रॅम किं. १२,६०,२८,०००/-रुपयेचा हस्तगत करण्यात आला.सदरची कार्यवाही विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात अपोअ. खामगांव, बि.यो महामुनी- अ.पो. अ. बुलढाणा, मनिषा कदम उपविपोअ. देऊळगांव राजा यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली, पोनि,अशोक एन लांडे यांचे नेतृत्वात, सपोनि, आशिष रोही, रुपेश शक्करगे, पोउर्पान,सचिन कानडे, प्रताप बाजड, सर्पा, राजकुमार राजपूत, मपोहेकॉ. ननिता शिंगणे, पोहेकॉ. दिनेश बकाले, दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पुरुषोत्तम पाटील, पुरुषोत्तम आघाव, अनुपकुमार मेहेर, राजेंद्र टेकाळे, सतीश हाताळकर, पोना, विजय वारुळे, युवराज राठोड, गजानन दराडे, विजय पैटणे, पोकों मंगेश सनगाळे, दिपक वायाळ, भारत जाधव, चापोहेकों शिवानंद मुंढे, समाधान टेकाळे, चापोना. सुरेश भिसे, चापोकॉ. विलास भोसले स्था.गु.शा. बुलढाणा यांनी केली आहे.

Previous Post Next Post