स्वराज्याची नीती साडेतीनशे वर्षांपूर्वी जगाने आत्मसात केली.ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि बजरंग दलाचे आयोजन.


 
स्वराज्याची नीती साडेतीनशे वर्षांपूर्वी जगाने आत्मसात केली.ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि बजरंग दलाचे आयोजन.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

अमेरिकेची रॉ आणि इज्राईल ची मोस्को गुप्तहेर यंत्रणा बहिरजी नाईक आणि छत्रपतींच्या नीतीवर आजही कार्य करते. छत्रपती शिवरायांनी गाव खेड्यातील सवंगड्यांना सोबत घेऊन स्वराज्याची संकल्पना पूर्णत्वास नेली. ती कार्यपद्धती इंग्रज, पोर्तुगीज, डज,अमेरिका, इजराइल, व्हिएतनाम सारख्या बलाढ्य देशांनी स्वीकारली म्हणून छत्रपतींचे स्वराज्य साडेतीनशे वर्षांपूर्वीच जगात अजरामर झाले. स्वराज्यात राजासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांची फौज छत्रपतींचे बलस्थान ठरले. नीतिमत्ता, त्याग आणि समर्पणाच्या संस्कारातून स्वराज्याचे संरक्षक कवच निर्माण झाले. असे मत शिवव्याख्याते ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केले.छत्रपती शिवरायांच्या 395 व्या जयंतीनिमित्त वडगाव खंडोपंत येथे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर यावर 19 फेब्रुवारीला सायंकाळी आयोजित व्याख्यानात रोठेनी उपरोक्त मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती वडगाव आणि राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा शाखेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित व्याख्यानमालेला सुशांत शेळके.भुपेश पाटील भुषण शेळके गोविंदा पाटील,विलास ठाकरे,नागेश पाटील,धनराज पाटील,कुंदन शेळके,गणेश रोडे,प्रदीप सोनवणे,शुभम शेळके,निंबाजी पाटील,वैभव शेळके, रोहन शेळके,स्वराज्य पाटील,सुरेखाताई निकाळजे, पंचफुला गवई यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची आरती आणि मानवंदना देऊन सामुहिक अभिवादनाने व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि वर्तमान परिस्थितीवर आपल्या खास शैलीत ॲड रोठेनी वास्तिकतेवर आधारित छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडला. तालुक्यातील महिला आणि युवकांची बहुसंख्येने उपस्थिती शिव विचारांचा जागर करून गेली.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती वडगाव खंडोपंत आणि राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा शाखेचे सर्वश्री पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. प्रास्ताविक सुशांत पाटील तर संचालन भूपेश पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने छत्रपती शिवरायांना मानवंदना देत समारोप करण्यात आला. 

Previous Post Next Post