सोन्याच्या गिंन्या दाखवून दोन लाखाची फसवणूक.. दोन आरोपी अटकेत...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यामध्ये कमी किमतीत सोने मिळून देणारे मोठे रॅकेट सक्रिय असून यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय असून या प्रकारच्या घटनेत दिवसेंदिवस दिवस वाढ होत आहे असाच एक प्रकार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी जामोद चौकीच्या हद्दीत घडल्याची घटना समोर आली आहे.. एका महिलेने बारीक पिवळ्या रंगाच्या सोन्याच्या गिन्न्या कमी पैशात मिळत असल्याची बतावणी करून बाळापुर तालुक्यातील सुनील चंद्रभान तायडे यांची दोन लाख रुपयाची फसवणूक केल्याची घटना जळगाव तालुक्यातील ग्राम जामोद येथे घडली असून..
याबाबत बाळापुर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथील फिर्यादी सुनील चंद्रभान तायडे यांनी दिनाक १९ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ..यामधील आरोपी भारत भोसले व दिनेश भोसले व महिला अश्या एकूण तीन आरोपींनी फिर्यादी सुनील तायडे यांना कमी पैश्यामध्ये सोन्याच्या गिन्न्या देतो असे सांगून सोन्याच्या गिन्न्या घेण्यासाठी जामोद येथून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या मालठाणा येथे आरोपीचे साथीदार महिलेने घरातील पिवळ्या रंगाचे सोन्यासारख्या गिन्न्या दाखवल्या त्यानंतर सोन्याची किंमत ठरवून दोन लाख रुपये नगदी देण्याच्या अटीवर प्रथम पैसे द्या नंतर सोने देतो असे सांगून फिर्यादीने दोन लाख रुपये सोन्याच्या गिन्न्याच्या बदल्यात आरोपींना दिले.पैसे दिल्यानंतर सोन्याच्या गिन्न्या मागितल्या परंतु तीनही आरोपींनी फिर्यादी सुनील तायडे व त्यांचा मित्र यांच्या जवळील रिअलमी व मायक्रोमॅक्स कंपनीचे दोन मोबाईल फोन काढून घेऊन आरोपी पसार होते. सुनील तायडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी भारत भोसले व इतर दोन यांच्या विरुद्ध अप,क्रमांक ९६/२०२५ नुसार कलम ३१८,(४) ३ (५) बी,एन,एस अन्वये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास करीत असतांना दिनांक २० फेब्रुवारी रोजी पोलिसांनी दोन आरोपी भारत भोसले व दिनेश भोसले यांना पोलिसांनी मालठाणा येथुन अटक केली आहे. दोन्हीही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २१ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.घटनेचा पुढील तपास जळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ करीत आहे .
