राज्य मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या बैठकीचे परतवाडा येथे यशस्वी आयोजन...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
20 फरवरी 2025 राज्य मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन परतवाडा येथील विश्रामगृहात भवानी हॉटेल समोर, चिखलदरा स्टॉप जवळ बुधवार (19 फेब्रुवारी) रोजी करण्यात आले. या बैठकीत संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीला प्रमुख उपस्थित संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, विदर्भ अध्यक्ष संजय जोशी, जिल्हा अध्यक्ष ललित कांबळे सर, तसेच राजू भास्करे केंद्रीय संचालक अमरावती जिल्ह्याचे कार्याध्यक्ष फिरोज खान, पत्रकार मोईन चव्हाण, उज्वल अगरवाल, संतोष भालेराव, मोहम्मद अझरुद्दीन नाझीम शा, सय्यद अस्लम, , प्रमोद नवाळे, रुपेश बाजपाई, मनीष गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारांच्या समस्या आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा...
या महत्त्वाच्या बैठकीत अचलपूर-परतवाडा शहरातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या विविध समस्या, संघटनेच्या भविष्यातील कार्ययोजना, पत्रकार संरक्षण, आणि पत्रकारांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे आणि ललित कांबळे सर यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांचे हक्क आणि सुरक्षा ही संघटनेची सर्वोच्च जबाबदारी आहे." तसेच त्यांनी पत्रकारांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संघटनेतर्फे प्रयत्न केले जातील, असे सांगितले.संघटनात्मक एकजुटीवर भर या वेळी संघटनेचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज खान आणि मोईन चव्हाण यांनी बैठक आयोजनाची जबाबदारी पार पाडली. संचालन आणि आभार प्रदर्शन रुपेश बाजपाई यांनी केले. पत्रकारांनी आपल्या समस्या मांडाव्यात आणि संघटनेच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढण्यात यावा, असा ठराव यावेळी करण्यात आला.या बैठकीमुळे परतवाडा आणि अचलपूर परिसरातील पत्रकारांमध्ये संघटनात्मक एकजूट निर्माण झाली असून, भविष्यात पत्रकारांसाठी अधिक कार्यक्षम पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
