राजर्षी शाहू मल्टीस्टेटने सामान्यांना पाठबळ दिले- डॉ. रतनसिंग राजपूत...


 
राजर्षी शाहू मल्टीस्टेटने सामान्यांना पाठबळ दिले- डॉ. रतनसिंग राजपूत...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांना पाठबळ देण्याचे काम राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या माध्यमातून केले जात आहे. पारदर्शक व्यवहारातून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याने या पतसंस्थेची नक्कीच भरभराट होणार, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ.रतनसिंग राजपूत यांनी केले.राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या खामगाव शाखा स्थलांतराचा उद्घाटन सोहळा शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांच्या हस्ते २१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. स्थानिक सकळकळे कॉम्प्लेक्स, टॉवर चौकात हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, नानाभाऊ कोकरे, राष्ट्रवादी नेते देवेंद्र देशमुख, संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके, संस्थाध्यक्षा मालती शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post Next Post