सुनगाव जिल्हा परिषद शाळेत माता रमाई आंबेडकर जयंती साजरी...


 
सुनगाव जिल्हा परिषद शाळेत माता रमाई आंबेडकर जयंती साजरी...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा तसेच उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक ७ फेब्रुवारी रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचरणी माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे पदवीधर शिक्षक प्रदीप वाकेकर तसेच बेग सर, उर्दू शाळा मुख्याध्यापक मजहर शेख यांच्या हस्ते त्यागमूर्ती, करुनेचा सागर माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका कुमारी अस्मिता क्षिरसागर यांनी माता रमाईचे कष्टमय जीवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील रमाई चे स्थान त्यांनी केलेला आजीवन त्याग याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले तसेच शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. तसेच काही विद्यार्थ्यांनींनी माता रमाई विषयी गीतांचे गायन केले. यावेळी शाळेच्या शिक्षिका साबे मॅडम यांचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत खो-खोच्या विभागीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार जिल्हा परिषद मराठी शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अस्मिता क्षिरसागर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन खिरोडकार सर यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बेग सर, प्रदीप वाकेकर सर, अंबडकार सर, अस्मिता क्षिरसागर, साबे मॅडम, बोंबटकार मॅडम, गवई मॅडम, उमाळे मॅडम, कर्मचारी मनोहर वानखडे राजु अंदुरकार यांच्यासह बहुसंख्येने शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post