जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पंचायत समिती खामगावची झाँकी द्वितीय क्रमांकाने सन्मानित!!


जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पंचायत समिती खामगावची झाँकी द्वितीय क्रमांकाने सन्मानित!!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन दि.04/01/25 ते 06/01/25 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.या महोत्सवाची सुरुवात झाँकी या प्रकाराने करण्यात आली.बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या विषयांवर आधारित संदेश देणाऱ्या झाँकीचे सादरीकरण केले.पंचायत समिती खामगाव गट विकास अधिकारी मा.राजपुत साहेब गटशिक्षणाधिकारी मा.गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली व क्रीडा समन्वयक मा.चेके साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी व सांस्कृतिक विभाग प्रमुख मा.सोळंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाँकी~कथा भारत के एक शहीद परीवार की या विषयावर सादरीकरण करण्यात आली.या झाँकीतून असीम देशभक्ती,सैनिकांची शौर्य कथा,सैनिकांचा देशासाठी परिवाराचा त्याग,हिंदू, मुस्लिम,शिख भाई यांची देशभक्ती,भारत देशाची एक वीरमाता,शहीद पतीचे बलीदान,शहीद मुलाचे बलीदान,दोन सैनिक भावांचे देशप्रेम, पती आणि मुलगा शहीद झाल्यावर त्याचं परीवारातील मुलीचे देशसेवेत समर्पण, सर्वांच्याचं डोळ्यात अश्रूंच्या धारा,देशासाठी शहीद झालेल्या संपूर्ण शहीद परिवाराच्या या कहानीला (झाँकीला) जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

   द्वितीय क्रमांक पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.बी.एम.मोहन साहेब, उप मुख्यकार्यकारी अधिकारी मा.आशिष पवार साहेब,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.प्रकाश राठोड साहेब यांच्या हस्ते पंचायत समिती खामगाव झाँकीला देण्यात आला.या झाँकीमध्ये प्रमुख भुमिका गणेश राऊत सर,सुरेश राऊत सर, अलका धाडे मॅडम,रेखा भुंबरे मॅडम,रेखा सोळंके मॅडम,प्रतापसिंग चव्हाण सर,दिनेश गवई सर, स्नेहल दलाल मॅडम, कार्तिका ठाकरे मॅडम,गंगा चवरे मॅडम,आशा सावळे मॅडम,छाया ठाकरे मॅडम, पुष्पलता कानोडजे मॅडम, गजानन घटे सर,दिपक खडसान सर,काशीराम वाघमारे सर,कृष्णा वाईकर सर,मो.दानीश गुलाम सज्जाद सर,आशय माटे सर,भास्कर इंगळे सर,संस्कृती पडघान मॅडम,नम्रता वर्धे मॅडम, गि-हे मॅडम यांनी सुंदर अभिनय सादरीकरण केले.या झाँकीचे उत्कृष्ट संचलन विठ्ठल पाटेखेडे सर यांनी केले.या झाँकीला सहकार्य सुरवाडे सर,जुमळे सर,मंगेश पवार सर,घिवे सर,ठाकरे सर,खान सर,प्रधान सर,सुरडकर सर,हाफीज सर,हांडगे सर,कानपुरे सर,जाधव सर,चोपडे सर,पारखे सर,नारखेडे साहेब,पल्हाडे सर,खंडारे सर,देवगुंडे मॅडम व सर्व पं.स.खामगाव कर्मचारी, शिक्षक बंधू व भगीनी यांनी केले

Previous Post Next Post