जळगाव जामोद तालुक्यात शिधापत्रिका धारकांच्या इ- केवायसीसाठी कॅम्पचे आयोजन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंतोदय अन्न योजना व प्रधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधा पत्रिका धारकांना शासकीय अनुदानित अन्न व धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे ज्या सदस्यांचे ई-केवायसी मुदतीत पूर्ण होणार नाही त्यांचा अन्य धान्याचा लाभ बंद होणार आहे तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्तभाव दुकानदाराशी संपर्क करून तात्काळ आपली इ केवायसी पूर्ण करून घ्यावे अन्यथा रेशनकार्डातून त्या व्यक्तीचे इ केवायसी होणार नाही अशा व्यक्तींची नावे शिधा वगळण्यास किंवा त्यांचे शिधा मिळण्यास बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शिधापत्रिका भारत यांची राहील अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना शासनाकडून प्राप्त झालेले आहे ह्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद चे तहसीलदार पवन पाटील प्रठाधिकारी गायकवाड साहेब व आठवले साहेब यांनी जळगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांची एकत्र सभा घेऊन तालुक्यात कोणताही व्यक्तीही ई केवायसी पासून वंचित राहू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे व आपल्या आपल्या गावामध्ये कॅम्पसचे आयोजन करून गावामध्ये धोंडी देऊन सर्व रेशन कार्ड धारकांची ई केव्हाची करून घ्यावे या अनुषंगाने आज जामोद येथील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी कॅम्पचा आयोजन करून गावातील सर्व रेशन कार्ड धारकांचा एकच ठिकाणी एक ऐवायसीचा आयोजन केलेला होता या कॅम्पमध्ये लोकांनी गर्दी करून आपले ई केवायसी मोठ्या प्रमाणात करून घेतले आहे.
