येनगाव ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाची लेखी आश्वासनाने सांगता... लवकरच रस्त्याचा प्रश्न निकाली निघणार..
जळगाव जामोद प्रतिनिधी-
येनगाव बस थांबा ते गावापर्यंत रस्ता बांधकाम करा, या मागणी करिता ग्रामस्थांचे बस थांब्यावर बसून आमरण उपोषण चालू केले होते त्या आमरण उपोषणाची दिनांक ०८ फेब्रुवारी बांधकाम विभागाच्या लेखी पत्रानुसार सांगता करण्यात आली.दिनाक ७ फेब्रुवारी पासून जळगाव जामोद तालुक्यातील येनगाव येथील ग्रामस्थांचे रस्ता बांधकाम करा या मागणी करिता येनगांव येथील बस थांब्यावर उपोषण सुरू केले होते .उपोषणापूर्वी गावातील अरविंद जानराव वायझोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद व जिल्हा परिषद विभाग बुलडाणा यांना दिनाक ६/०२/२०२५ रोजी उपोषणाबाबत निवेदन सादर केले होते या निवेदनात येनगाव येथील बस थांब्या पासून गावापर्यंत गेल्या १२ वर्षापासून रस्ता झालेला नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.गावाचा पोहच रस्ता बनविण्यात यावा याकरिता वेळोवेळी निवेदन सादर केले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केल्या गेली नाही. तरी रस्त्याचे तात्काळ बांधकाम करा अन्यथा,लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता असे असताना प्रशासनाने स्पष्ट भूमिका न घेतल्याने अखेर अरविंद वायझोडे यांना उपोषणास बसावे लागले आहे. सदर उपोषणास संपूर्ण गांवकर्यानीं पाठिंबा दिला होता. तसेच दिनांक ८/०२/२०२५ रोजी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपजिल्हा अभियंता पुंडकर साहेब व तालुका अभियंता भेलके साहेब यांच्यासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवला, यावेळी तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक,अशोक मुरुख, सुहास वाघ, आदित्य प्रसेनजीत पाटिल, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे,युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे, शिवसेनेचे अमोल दाभाड़े, यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी रामेश्वर वायझोडे, वासुदेव वायझोडे,महादेव भारसाकळे, प्रमोद वायझोडे,राजेश वायझोडे,गणेश कुकड़े, अरुण वायझोडे, विद्याधर वायझोडे यांच्यासह मोठ्या संख्येने गांवकरी उपस्थित होते.
