महाशिवरात्री निमित्त जामोद जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रम...


 
महाशिवरात्री निमित्त जामोद जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रम...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

विराट नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामोद येथे महाशिवरात्रीच्या व संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने श्री नारायणेश्वर मंदिरात जनता विद्यालयाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात्रेसाठी मंदिर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने जामोद जनता विद्यालयाच्या 7 अ आणि 7 ब वर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा संकलन करून स्वच्छता राखण्याचा संदेश दिला.या उपक्रमाचे विद्यालयाच्या मुख्याध्यापक, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. स्वच्छता अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होईल, असे शिक्षकांनी सांगितले. या समाजोपयोगी कार्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Previous Post Next Post