मालवाहू बोलेरो च्या धडकेने आचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू... आरोपी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल...


मालवाहू बोलेरो च्या धडकेने आचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू... आरोपी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

बोलेरो पिकअप च्या धडकेने जळगाव जामोद येथील आचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जळगाव जामोद नांदुरा महामार्गावरील आसलगाव नजिक दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.. जळगाव जामोद शहरातील राजपुत पुरा येथील रहिवासी मोहनसिंग विजयसिंग चव्हाण वय ४३ हे आसलगांव येथील एका हाँटेलमध्ये कारागीर असुन दररोज ते जळगाव ते आसलगांव जाणे येणे करीत असतात दिनांक १ मार्च रोजी मोहनसिंग चव्हाण हे सकाळीच पैदल आसलगाव बाजार येथे हाँटेलला जाण्यासाठी घरून निघून गेले व जळगाव नांदुरा महामार्गावरील आसलगांव जवळील मधुकर ढोले यांच्या शेताजवळ त्यांना बोलेरो पिकअप मालवाहू वाहन क्रमांक एमएच ४३ बीबी १०३३ च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोहनसिंग चव्हाण यांना धडक दिली त्यामुळे मोहनसिंग हे गंभीर जखमी झाले होते.यावेळी ड्रायव्हरने जखमी अवस्थेत असलेल्या मोहनसिंग यांना उपचारासाठी न नेता शेताजवळील एका पाण्याच्या वाँलच्या पाठीमागे नेऊन ठेवले होते.काही नागरिकांना एक इसम जखमी अवस्थेत पाण्याच्या वालजवळ पडलेला दिसल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.गंभीररित्या जखमी असल्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते परंतु त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.सदर घटनेची फिर्याद मृतक मोहनसिंग यांच्या भावाने पोलीस स्टेशनला दिल्याने आरोपी बोलेरो पिक अप मालवाहू वाहनाचा चालक आसिफ शेख शब्बीर रा.पहूर ता.जामनेर जि.जळगांव खान्देश यांच्याविरोधात अप क्र.१२३/२०२५ कलम २८१,१०६(१) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहेत.

Previous Post Next Post