राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आर्टिफिशल इंटेलिजन्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन...


 
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आर्टिफिशल इंटेलिजन्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, पळशी वैद्य द्वारा संचालित बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे, येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अँड. सलीम पटेल साहेब, सहसचिव श्री. रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल, संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२५ चे औचित्य साधून महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग, रिसर्च प्रमोशन सेल व आय. क्यू.ए. सी. यांच्या अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेची सुरुवात सर सी. वी. रमन व बी. एस. पटेल गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. सदर कार्यशाळेचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. एफ.टी. शेख यांनी भूषवले तर सदर कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा येथील प्रा. सचिन जोशी उपस्थित होते. सदर कार्यशाळेमध्ये डॉ. पी. व्ही. पिंगळे प्राचार्य, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा व डॉ. जी.डी. तांबटकर रसायनशास्त्र विभाग, बुरुंगले महाविद्यालय, शेगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली व त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व व रमण इफेक्ट या विषयावर माहिती दिली. सदर कार्यशाळेमध्ये प्रा. सचिन जोशी यांनी विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स ची माहिती दिली व त्या टूल्स चा वापर कसा करावा हे प्रत्यक्ष करून दाखवले.सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. एम.पी. जांभळे, आभार प्रदर्शन डॉ. सी.बी. पलन व नियोजन प्रा. शकील खान यांनी केले.सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्रा. एम. डी. नेतनस्कर, डॉ. एस. ए. काजी, डॉ. एन. के. अग्रवाल, डॉ. बाबाराव सांगळे, प्रा. एन. जीं. आसोले, प्रा. पी. एन. बाठे, प्रा. आनंद जाधव, प्रा. दिपाली शिरसाट. प्रा. झोया आफरीन, प्रा. विकास ईसोकार, प्रा. अमोल वानखडे, प्रा. रूपाली आंबेकर व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post