कोल्हटकर महाविद्यालयामध्ये बक्षीस व पदवी वितरण तसेच माजी विद्यार्थी मेळावा संपन्न...


 
कोल्हटकर महाविद्यालयामध्ये बक्षीस व पदवी वितरण तसेच माजी विद्यार्थी मेळावा संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये संविधान गौरव महोत्सव बक्षीस वितरण, पदवी वितरण, तसेच महिला दिन स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला याच कार्यक्रमांमध्ये जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय श्रीरामजी कुटे यांचा जळगाव शिक्षण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्या हस्ते जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय श्रीरामजी कुटे यांचा मोमेंटो शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती म्हणून बोलताना डॉक्टर संजय कुटे यांनी विद्यार्थ्यांथनी परंपरागत शिक्षणाबरोबरच स्किल शिक्षणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे जेणेकरून बेरोजगारीच्या समस्या सुटतील व विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील असे प्रतिपादन करीत असतानाच जळगाव जामोद मधील शिक्षण संस्थांनी स्टील बेस कोर्सेस आणण्यावर लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिपादित केली तसेच येत्या कालावधीमध्ये जळगाव जामोद मतदार संघात मध्ये विकासात्मक दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये कायापालट होईल असे सांगितले.याप्रसंगी पदवी वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी जळगाव शिक्षण मंडळाचे संचालक अनिल जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांनी परंपरागत पदवी घेत असतानाच सामाजिक जाणिवेचे भान ठेवत कौशल्यावर आधारित व्यावसायिक उपक्रम निवडून आपले बेरोजगारीचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर निलेश निंबाळकर राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी पार पाडले तर अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य महोदयांनी जळगाव जामोद मतदारसंघात मोठे उद्योग आल्यास काही प्रमाणात बेरोजगारीचे प्रश्न सुटण्यास मदत होईल असे सांगितले श्रीयुत संजय गाडेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले याच कार्यक्रमादरम्यान संविधान गौरव महोत्सवाच्या अंतर्गत ज्या विविध निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचे तसेच जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने ज्या मैदानी स्पर्धा झाल्या या सर्व कार्यक्रमांचे बक्षीस वितरण माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते पार पडले त्याचबरोबर मंचकावरील मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सत्र 2023 -24 मधील बीए बीकॉम पदवींचे वितरण करण्यात आले याप्रसंगी जळगाव शिक्षण मंडळाचे सन्माननीय सदस्य अविनाश कुलकर्णी, मिलिंद जोशी, गायत्री विप्रदास यांची उपस्थिती होती आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी कार्यक्रमांची संपूर्ण रूपरेखा मांडली याच कार्यक्रमांतर्गत राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर निलेश निंबाळकर यांच्या आंतरराष्ट्रीय संबंध, सामाजिक शास्त्र, भारतीय व्यवस्थेतील पंचायतराज व्यवस्था या पुस्तकांचे विमोचन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते पार पडले तसेच श्रुत संजय गाडेकर यांना प्राप्त झालेल्या ग्लोबल ऑर्गनायझेशन तर्फे भारत भूषण पुरस्कारासंदर्भात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Previous Post Next Post