जि.प.प्राथमिक मराठी शाळा, गौलखेडा बाजार येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा... !


 जि.प.प्राथमिक मराठी शाळा, गौलखेडा बाजार येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा... !

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार येथील जागतिक महिला दिन ०८ मार्च २५ शनिवार ला जि.प. प्राथ. म. शाळा, गौलखेडा बाजार येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांचे प्रतिमेचे उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांचे, शा.पो.आहार स्वयंपाकी व मदतनिस या सर्वांचे शाल देऊन सत्कार करण्यात आले.तसेच शाळेतील मुख्यमंत्री पुर्व प्रशिक्षणार्थी सौ.सविता दिपक चव्हाण हिला साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आले. २५ जानेवारीला झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नागरिकांकडून प्राप्त झालेल्या खाऊतून सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बाॅटल व पेनपाऊच वाटप करण्यात आले.०८ मार्च ला जागतिक महिला दिन का साजरा केला जातो ? भारत देशात केव्हापासून व कसे जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली ? याबाबत शाळेतील सहा.शिक्षक राजेंद्र तुकाराम काळे सरांनी उत्कृष्ट माहिती दिली. या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला गौलखेडा बाजार केंद्राचे केंद्रप्रमुख सविता ताई भाष्करे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी बोरोळे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनिषा मावस्कर, महिला सदस्या सौ.सरिता पटोकार, सौ.मंदिनी बेलसरे, सौ.अबिता विजय मावस्कर, सौ.भगिरथी दारसिंबे, सौ.मिना बारवे, सौ.प्रमिला मेटकर, स्वंयपाकी श्रीमती सुनिता बेलसरे व कु.लक्ष्मी बेलसरे या सर्वांचे उपाध्यक्ष श्री.दिपक दारसिंबे उपाध्यक्ष शा.व्यवस्थापन समिती, श्री.गौरव नागले सदस्य, श्री.रुृत्विक अंबोरे सदस्य,श्री.कमल राजने सदस्य,श्री.भाऊराव महल्ले व स.शिक्षक श्री.राजेंद्र काळे यांचे हस्ते सर्व महिलांचे शाल देऊन सत्कार करण्यात आले. लगेच सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री.राजेंद्र काळे व आभार प्रदर्शन शाळेतील मुख्याध्यापिका सौ.शुभांगी बोरोळे मॅडम यांनी केले.

Previous Post Next Post