भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने पारधी वाड्यावर लहान मुलांना साहित्य वाटप...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद मतदारसंघाचे कर्मवीर जलयोद्धा कर्मयोद्धा, विकास पुरुष माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ९ मार्च रोजी जळगाव शहरातील वाडी खुर्द, पारधी वाडा येथे लहान मुलांना बिस्कीट व इतर साहित्य वाटपाचा कार्यक्रम भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा बुलढाणा विभाग खामगाव च्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यासाठी अंबादास निंबाळकर(जिल्हाध्यक्ष भाजपा दिव्यांग आघाडी)चंद्रकांत शिंदे,सुनील डाबेराव, राजु बडेरे,आनंद भोसले,प्रमोद झंवर,बारहाते,संतोष चिकटे,श्रीकृष्ण वडनेरकर, भोलु पवार, प्रमोदजी झंवर, सर्वेश हातेकर,सागर पवार, प्रताप भोसले,अर्जुन भोसले,किसना पवार तसेच इतर सर्व भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा बुलढाणा विभाग खामगाव चे पदाधिकारी उपस्थित होते.
