वंदना बोडखे महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित.


 वंदना बोडखे महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित.

 जळगाव जामोद प्रतिनिधी....

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे २५ मार्च रोजी महिला सक्षमीकरण मेळावा व स्त्री शक्ती उत्सव चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये जामोद येथील वंदना बोडखे यांना महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना कृषी व कृषी संलग्न व्यवसाय उभारून त्यामध्ये यशस्वी झेप घेऊन इतर महिलांसमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल देण्यात आला. वंदना बोडखे यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये दाल मिल आणि दुग्ध व्यवसाय उभारून स्वतःची आर्थिक प्रगती साधली. हे व्यवसाय करताना कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.विकास जाधव व शास्त्रज्ञ शामसुंदर बोर्डे तसेच केंद्राचे तज्ञ मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन लाभले. हा पुरस्कार डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख, जिल्हा परिषद च्या सीईओ बी. वैष्णवी, कार्यकारी परिषदेच्या सदस्या हेमलता अंधारे, डॉ. उंदीरवाडे ,डॉ. शामसुंदर माने, डॉ. काळबांडे, डॉ पंचभाई आणि विद्यापीठातील सर्व कर्मचारी अधिकारी तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यातील सर्व यशस्वी उद्योजिका उपस्थित होते.

Previous Post Next Post