शेगावात जड वाहनांना बंदी घालावी..शहर पो स्टे व पालिका प्रशासनाकडे विविध सामाजिक संघटनांची मागणी...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
शेगांव शहरातील वर्दळीच्या मार्गावर जड वाहनांना बंदी घालून जड वाहतूक गावाबाहेरून वळवावी,अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहर पोलीस स्टेशन, नगर पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.संत गजानन महाराज समाधी मंदिर असल्याने शहरात दर्शनासाठी असंख्य अशा प्रवासी वाहने येतात. शहरात वाहनांच्या वर्दळीचे प्रमाण वाढले आहे. अशातच शेगांव शहरातील माणिक स्टेअर्स, शिवनेरी चौक, मुरारका शाळेजवळील चौक, काशेलानी पेट्रोल पंप या रस्त्यावर कन्या शाळा, महात्मा ज्योतीबा फुले शाळा, अहील्यादेवी होळकर न प शाळा, मौलाना अब्दुल आझाद शाळा, टिपू सुलतान शाळा, राष्ट्रमाता इंदीरा गांधी शाळा, ग भि मुरारका शाळा, ग.भी. मुरारका महाविद्यालय आहे. दररोज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासुन ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हजारो विद्यार्थी या रस्त्याने ये जा करत असतात. आधीच या रस्त्यावर भाविक भक्तांच्या चारचाकी वाहनांची वर्दळ असते. त्यातच आता जड वाहने सुध्दा या रस्त्याने येत जात असुन जड वाहने ही भरधाव वेगाने जाताना दिसुन येतात यामुळे या रस्त्याने ये जा करणा-या विद्यार्थ्याच्या जिवाला धोका निर्माण आला आहे. नुकतीच मुरारका शाळेजवळ एका भरधाव जड वाहनाने झालेल्या अपघातात इसमाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा भविष्यात होवुन नये त्यासाठी माणिक स्टोअर्स येथुन ते काशेलानी पेट्रोल पंप पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात यावी ,अन्यथा भविष्यात अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्यास सदर घटनेस आपले पोलिस व नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील. यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आदोलन करण्यात येईल.असा ईशाराही विहिपचे चंद्रकांत घोराळे,युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव,श्रीशिवप्रतिष्ठानचे प्रविण मोरखडे,भाजपाचे रोहीत धाराशिवकर, मुकुंदा खेडकर, सतीश पल्हाडे ओम शेगोकार किरण भारताकडे नंदकिशोर काळे ईश्वर मोरखडे वैभव धनगर अजय आसोलकर स्वप्निल सराटे प्रशांत शेगोकार आनंद गोयल शिव शेगोकार अक्षय गायकवाड प्रशांत पवार रवींद्र खेडकर दिला आहे...
_________________________________________
● शहरातील माणिक स्टोअर्स ते काशेलानी पंप पर्यंत च्या मार्गावर जड वाहतुकीला प्रतिबंध घालावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.त्यामुळे पोलीस व पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेवून नागरिकांना दिलासा द्यावा.
- चंद्रकांत घोराळे
- सामिजिक कार्यकर्ते शेगाव..
