बुलढाणा जिल्ह्यातील मन सुन्न करणारी घटना...जन्मदात्या बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. डी एन ए च्या अहवालावरून बापा विरुद्ध गुन्हा दाखल


 
बुलढाणा जिल्ह्यातील मन सुन्न करणारी घटना...जन्मदात्या बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. डी एन ए च्या अहवालावरून बापा विरुद्ध गुन्हा दाखल 

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी... 

दवाखान्यामध्ये पोटदुखीची तपासणी करण्यासाठी गेलेली अल्पवयीन पीडिता ही 28 आठवड्याची गर्भवती असल्याचे आढळून आल्यामुळे तिच्यावर अज्ञात नराधमाने अत्याचार केला असल्याची घटना दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी जलंब पो.स्टे.च्या हद्दीत असलेल्या एका गावामध्ये उघडकीस आली होती. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून जलंब पोलिसांनी अज्ञात नराधम आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र दीड वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेतील अल्पवयीन मुलगी गर्भवती निघाली असल्याच्या प्रकरणामध्ये डीएनएच्या अहवालामध्ये बापानेच अत्याचार केला असल्याचे उघड झाल्यामुळे आरोपी नराधम बापाला जलंब पोलिसांनी अटक केली आहे...

     याबाबत वृत्त असे की नांदुरा येथील एका खाजगी हॉस्पिटल मधून त्यांचे सही व शिक्का असलेले लेखी पत्र नांदुरा पोस्टेला दिले कि त्यांच्या हॉस्पिटल या दवाखान्यामध्ये एक 17 वर्षीय पीडित अल्पवयीन बालिका ही पोटदुखीची तपासणी करण्यासाठी आली होती. तेव्हा त्या पीडीतेच्या पोटाची सोनोग्राफी डॉक्टरांनी केली असता ती 28 आठवड्याची गर्भवती असल्याचे आढळून आली होती. तर सदर पीडित बालिका ही अविवाहित असून नाबालिक असल्याचे पत्रात नमूद होते. मात्र घटनास्थळ हे जलंब पो.स्टे हद्दीत असल्यामुळे नांदुरा पोलिसांनी सदर पत्र हे जलंब पोस्टेला दिले होते. यावरून सदर पीडीतेची पोलिसांनी तिच्या राहत्या घरी व गावामध्ये तसेच नांदुरा येथे जाऊन शोध घेतला असता ती मिळाली नाही तसेच तिच्या घरी सुद्धा कोणीही हजर मिळाले नाही. यावरून एका खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून जलंब पोलिसांनी अज्ञात नराधम आरोपीविरुद्ध अप नं १७७/२०२३ कलम ३७६,३७६(२) आय पी सी पोस्को अन्वे गुन्हा दाखल केला होता. तर या प्रकरणामध्ये आरोपीचा कोणताही सुगावा लागत नसल्यामुळे व घडलेल्या घटनेची फिर्याद देण्यासाठी कोणीही घरची मंडळी पुढे येत नसल्यामुळे जलंब पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून त्या पीडीतिची व तिच्या मुलीची तसेच पीडीतीच्या बापाची दि. 22/4/2024 रोजी डीएनए चाचणी घेण्यात आली व दि. 23/4/2024 रोजी अमरावती येथे डीएनए चाचणी चा अहवाल पाठवण्यात आला होता. त्यानंतर सदर अहवाल दि. 13/3/2025 रोजी जलंब पोस्टेला प्राप्त झाला असून सदर अहवालामध्ये जन्मदात्या बापानेच त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असल्याचे उघड झाल्यामुळे जलंब पोलिसांनी त्या नराधम बापाला अटक केली असून त्याला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली...एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सदर प्रकरणांमध्ये गुन्ह्यातील पीडित मुलगी व तिच्या घरातील तसेच आरोपी यांनी गुन्ह्याबाबत कुठलीच माहिती दिली नसताना सुद्धा जलंब पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले आहे.या तपासामध्ये तत्कालीन ठाणेदार अमोल बारापात्रे व ठाणेदार अमोल सांगळे, रायटर पो.का रवींद्र गायकवाड आदींनी मोलाची भूमिका बजावली आहे..

Previous Post Next Post