तुकोबांची अभंगवाणी कलियुगासाठी वरदान ठरली.. वारकरी भूषण शास्त्री महाराज.जगद्गुरु तुकोबांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष अन्नदान प्रबोधनातून संपन्न...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबा. ज्यांच्या अभंगवाणीतून कीर्तनातून छत्रपती शिवाजी राजे घडले. स्वराज्याची मुहूर्तमेढ तुकोबांच्या कीर्तनातून झाली. तुकोबांची अभंगवाणी कलियुगासाठी वरदान ठरली. असे मत वारकरी भूषण त्यागमूर्ती हभप वासुदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. जगद्गुरु तुकोबांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रवचनात उपरोक्त मत 16 मार्चला तुकाराम बीज दिनाच्या अनुषंगाने व्यक्त केले. यावेळी ज्ञानसागर विवेक मूर्ती हभप ज्ञानेश्वर महाराज पारस्कर माऊली भोटा, हभप रामशंकर महाराज अंत्रि, हभप प्रबोधनकार सतीशचंद्र रोठे पाटील, हभप शंकर शिमरे वाघजाळ, हभप प्रल्हाद राऊत मूर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. विधिवत काल्याचे किर्तन, दहीहंडी सोहळा संपन्न झाल्यानंतर तुकाराम बीज निमित्ताने मनोगत व्यक्त करताना हभप वासुदेव महाराज शास्त्री पुढे म्हणाले की,देशात राज्यात तुकोबांचे धर्मनिष्ठ वारकरी जिवंत आहेत म्हणूनच मानवता आहे.बालमनावर तुकोबांच्या अभंगातील विचारांचा लेप लावल्यास येणाऱ्या काळात देशाला उज्वल भवितव्यासाठी चरित्र संपन्न युवकांची फळी निर्माण होईल. कार्यक्रमाला मूर्ती, राजुर,खामखेड, परडा, शिरवा,वारूळ,खडकी,अंत्रि,रोहिनखेड, खामखेड, बोराखेडी, पुनही, सहस्रमुली, सांगळद, मोताळा, टाकळी, वाघजाळ, तरोडा, यासह तालुक्यातील टाळकरी, महिला, युवती, वारकरी,ग्रामस्थ शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
_
महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, प्रबोधनकारांची उपस्थिती.
सात दिवस कीर्तन,प्रवचनात अनुक्रमे हभप श्री पंढरीनाथ महाराज कोराळा बाजार, हभप श्री परमेश्वर महाराज गोंडखेड, हभप शालिग्राम सुरळकर भालेगाव बाजार, हभप ज्ञानेश्वर महाराज गावंडे निपाणा,शिवचरित्रकार हभप शिवाजी महाराज झामरे, हभप गजानन महाराज मांडवा,हभप सुनील महाराज करकीकर, हभप शिवचरित्रकार प्रबोधनकार सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या कीर्तन प्रवचन प्रबोधनाचे आयोजन दैनंदिन सायंकाळी करण्यात आले होते.
__
महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य,गायनाचार्यांची उपस्थिती.
मृदुंगाचार्य हभप माणिकराव महाराज पानेरा, उमेश महाराज वाघ भेंडवळ,गायनाचार्य हभप हरिभाऊ महाराज, गोपाल महाराज कचोरे,गणेश सुरडकर,गजानन मानकर,सुदाम दिवाने, विठ्ठल दिवाने,एकनाथ दिवाने,अवचित जुनारे यांची विशेष उपस्थिती होती. तर काकडा व हरिपाठ हभप गोराडे महाराज, अनंत महाराज पोटा यांच्या नेतृत्वात काकडा व हरिपाठ दैनंदिन संपन्न झाला. चोपदार सेवाकार्य ह भ प रामधन दिवाने गोपीचंद रबडे ह भ प प्रकाश जाधव यांनी केले.
__
सात दिवस मोफत अन्नदान,महाप्रसाद सेवा.
तर समारोप पुरणपोळीने.
सात दिवशीय सकाळ संध्याकाळ महाप्रसादासाठी समस्त गावकरी मंडळी टाकळी रुक्मिणी पांडुरंग संस्थान आश्रम,सचिन महादेवराव मोठे बुलढाणा, शिरवा ग्रामस्थ, स्वर्गीय दिलीप जगन्नाथ पाटील स्मृती प्रित्यर्थ प्रवीण पाटील, शिवाजी मामलकर मोताळा, मूर्ती ग्रामस्थ बाबुराव नंदू कर्नर वारुळी, अंजलीताई देशपांडे बुलढाणा, स्वर्गीय कौशल्याबाई शिंदे स्मृती प्रित्यर्थ निवृत्ती बोराळे कोली गवळी, महिला भजनी मंडळ परडा, वारुडी ग्रामस्थ, अमोल अरुण खोडके बुलढाणा, वाघजाळ आश्रम ग्रामस्थ, विठ्ठल रुक्मिणी संस्थान यांनी मोफत दैनंदिन अन्नदान सेवा दिली.तर दैनंदिन नाश्त्यासाठी आप्पा राजपूत आणि चहा व पाण्याची व्यवस्था संतोष महादेवराव गावंडे यांनी निशुल्कपणे केली. आयोजक समस्त गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या समस्त भक्तगणांना पुरणपोळीचा पाहुणचार देऊन तुकोबांचा वैकुंठ गमन सोहळा संपन्न करण्यात आला.
