चादपुर शेत शिवरातील बोऱ्याखेडा जंगलातील पाझर तलावाचे काम एकदम निकृष्ट दर्जाचे..


 
चादपुर शेत शिवरातील बोऱ्याखेडा जंगलातील पाझर तलावाचे काम एकदम निकृष्ट दर्जाचे..

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्याच्या खेडे गावाच्या जंगलाच्या परिसरात जल संधारण विभागाचे पुष्कळ पाझर तलाव असे अनेक प्रकारचे तलावाचे कामे झाले आहे व सुरु आहेत .त्याच प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील चादपुर या गावाच्या बाजुला बोऱ्याखेडा या जंगलात जलसंधारण विभागाचे एक पाझर तलावाचे काम झाले आहे.या पाझर तलावाच्या काम एका मराठवाड्यातील कंत्राटदाने केले असुन या पाझर तलावाच्या कामात अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने एकदम हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पाहायला मिळते.बोऱ्याखेडा जंगलातील शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार येथिल पाझर तलाच्या मातीच्या कामात काळी माती नाही टाकता त्या ठिकाणी पुर्णपणे मुरम दगडाने हे पाझर तलाव बांधण्यात आले आहे.असे म्हणने बोऱ्याखेडा जंगलातील शेत शिवारातिल  शेतकऱ्यांचे आहे.परंतु अशी माहिती RC24NEWS चॅनलचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजु भास्करे यांना मिळताच त्यानी या जंगलातील पाझर तलावाचे कामाची पाहणी केली असता या कामात खरोखरच पुर्णपणे मुरम,दगड टाकले असल्याचे चित्र दिसून येत आहे.या कामावर असलेले अधिकारी कुंभकर्णाची झोपेत होते का? हा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतो.

Previous Post Next Post