मोटारपंप चोर पोलिसाच्या जाळ्यात...


 मोटारपंप चोर पोलिसाच्या जाळ्यात...

हिवरखेड प्रतिनिधी :-प्रशांत भोपळे...

पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला येथे दि. 03/03/2025 रोजी फिर्यादी सचिन गजानन कोरडे वय 34 वर्ष रा. हिंगणी बु. ता. तेल्हारा जि. अकोला यांनी रिपोर्ट दिला की, त्यांचे हिंगणी बु. शिवारातील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी त्याचे शेताचे बाजुच्या कालव्यावर लावलेली त्यांची कार्गो कंपनीची मोटर मशिन हि दि. 01/03/2025 चे रात्री कोणीतरी चोरुन नेली आहे. तसेच त्यांचे गावातील आणखी पाच शेतकऱ्यांच्या सुध्दा कालव्यावर लावलेल्या मोटर मशिनी चोरुन नेल्या आहेत. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशनल अप.नं. 71/2025 कलम 303 (2) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद केला. गुन्ह्याच्या तपासात आरोपी 1) शेख जाकीर शेख जाबाज वय 31 वर्ष 2) शेख इमरान शेख वल्ली वय 32 वर्ष दोन्ही रा. बगीचा प्लाट हिवरखेड ता. तेल्हारा यांना अटक करुन आरोपीकडून 1) कार्गो कंपनीची व्ही 9 मॉडल मोटर मशिन किं.अं. 15,000 रु.2) सिआरआय कंपनीची मोटर मशिन किं.अं. 15,000 रु., 3) सिआरआय कंपनीची मोटर मशिन किं.अं. 15,000 रु., 4) मोनोब्लॉक कंपनीची मोटर मशिन किं.अं. 15,000 रु., 5) टेक्समो कंपनीची मोटर मशिन कि.अं. 15,000 रु., 6) टेक्समो कंपनीची मोटर मशिन किं.अं. 15,000 रु., 7) अॅक्वाटेक्स कंपनीची मोटर मशिन किं.अं. 15,000 रु. 8) अॅक्वाटेक्स कंपनीची मोटर मशिन किं.अं. 15,000 रु. 9) सुकू कंपनीची मोटर मशिन किं.अं. 15,000 रु. 10) वोटा कंपनीची मोटर मशिन किं.अं. 15,000 रु. 11) चोरी करण्यासाठी वापरलेली आरोपीची मोटर सायकल हिरो स्पेंडर प्लस विना नंबरची जिचा चेसीस नं. MBLHAW223P4C11460 किं.अं. 60,000 रु. असे एकुन 10 मोटर मशिन व 1 मोटर सायलक एकुन किंमत अंदाजे . 2,10,000 रु. जप्त करण्यात आले आहेत.सदरची कार्यवाही अनमोल मितल सहा. पोलीस अधिक्षक साहेब अकोट विभाग यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन हिवरखेडचे ठाणेदार गजानन राठोड, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाण, पोलीस हवालदार योगेश इंगळे पोकॉ. दिपक ढोले यांनी केली.

Previous Post Next Post